तरुण भारत

बिहार : मागील चोवीस तासात 18 नवे कोरोना रुग्ण, एकूण संख्या 767 वर

ऑनलाईन टीम / बिहार :

बिहारमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मागील चोवीस तासात 18 नव्या रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे बिहारमधील कोरोना बाधितांची संख्या 767 वर पोहचली आहे, अशी माहिती बिहारच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. 


मिळालेल्या माहितीनुसार, या 18 मधील 5 रुग्ण हे खगडिया मधील, 9 जण हे बेगुसराय जिल्ह्यातील, 2 जण दरभंगा मधील, बाका आणि सुपैलो जिल्ह्यातील प्रत्येकी एक जण आहे. 
बेगूसराय मधील सर्व नवीन रुग्ण हे बिहारचे प्रवासी मजदुर आहेत. यातील तीन जण हे दिल्लीतून, तीन जण सुरतमधून, एक जण गाजियाबादमधून, एक जण गुजरातमधून तर एक जण कोलकातामधून बिहारमध्ये आला आहे. 


दरम्यान, बिहारमध्ये आता पर्यंत 378 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आता पर्यंत बिहारमध्ये 34 हजार 662 जणांची चाचणी करण्यात आली आहे. 

Related Stories

स्वीत्झर्लंडमध्ये सर्वात मोठे चॉकलेट म्युझियम

Patil_p

कचरामुक्त शहरांची यादी जाहीर

Patil_p

ब्रू शरणार्थींच्या पुनर्वसनाच्या विरोधात निदर्शने

Patil_p

गुजरात दंगल, 17 दोषींना मिळाला जामीन

Patil_p

महाराष्ट्रातील 54 पोलिसांना राष्ट्रपती पोलिस पदक

prashant_c

बिहारमध्ये 1,081 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

pradnya p
error: Content is protected !!