तरुण भारत

उत्तर प्रदेश सहाय्यक अध्यापक भरती परीक्षेत 1 लाख 46 हजार 60 विद्यार्थी उत्तीर्ण 

ऑनलाईन टीम / प्रयागराज :

उत्तर प्रदेश बेसिक शिक्षा परिषदेकडून 69 हजार पदासाठी घेण्यात आलेल्या सहाय्यक अध्यापक भरती परीक्षांचे निकाल आज जाहीर करण्यात आले. यावर्षी या परीक्षेत 1 लाख 46 हजार 60 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती परीक्षा नियामक प्राधिकारी सचिव अनिल भूषण चतुर्वेदी यांनी दिली. 


ते म्हणाले, 65 टक्के कट ऑफच्या आधारे सामान्य वर्गातील 36 हजार 614 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर 60 टक्के कट ऑफच्या आधारे अनुसूचित जातीचे 24 हजार 308, अनुसूचित जन जमातीतील 270 आणि मागास वर्गातील 86 हजार 868 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 


पुढे ते म्हणाले, सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांची यादी बेसिक शिक्षा परिषदेकडे लवकरच पाठवली जाईल. त्यानंतर परिषदेकडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गुण, बीएड आणि बीटीसीचे गुण तसेच लेखी परीक्षेच्या आधारे अग्रक्रमानुसार अंतिम यादी जाहीर केली जाईल. 

Related Stories

कोरोनाबाधित 18 हजारहून अधिक

Patil_p

मध्यप्रदेश, राजस्थान पाठोपाठ आता महाराष्ट्रातही फटाके विक्रीवर बंदी ?

pradnya p

‘सीरम’चे लसीकरणाच्या युद्धात पाऊल

datta jadhav

कोरोना : दिल्लीतील बाधितांनी ओलांडला 6.30 लाखांचा टप्पा

pradnya p

पेरू, दक्षिण आफ्रिकेने ओलांडला 6 लाखाचा टप्पा

datta jadhav

जनगणना : कर्मचाऱयांचा सहभाग अनिवार्य

Patil_p
error: Content is protected !!