तरुण भारत

दिल्लीतील एअर इंडियाचे ऑफिस सील, एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

देशात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. देशाची राजधानी दिल्लीत देखील कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच आज दिल्लीतील एअर इंडियाच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे दिल्लीतील एअर इंडियाचे ऑफिस सील करण्यात आले आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या ऑफिसमधील एका 54 वर्षीय कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. हा कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्यामुळे तो होम क्वारंनटाइन होता. त्या दरम्यान, त्याची कोरोना चाचणी केली असता तो पॉझिटिव आढळला. यानंतर हे ऑफिस सील करण्यात आले आहे. 


दरम्यान, सध्या परदेशात अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडियाने वंदे भारत मिशन अंतर्गत विशेष विमाने पाठवण्यास सुरुवात केली आहे. आता पर्यंत 12 देशातील 15 हजार नागरिकांना पुन्हा भारतात आणले आहे. 

Related Stories

हज यात्रेकरूंसाठी सौदी अरेबियाचे नवे नियम

datta jadhav

योगी आदित्यनाथांकडून गंगायात्रेचा शुभारंभ

Patil_p

राफेलच्या पहिल्या तुकडीचे फ्रान्समधून उड्डाण

datta jadhav

‘सुपर मॉम’ मेरी कोम कडून एक महिन्याचा पगार व खासदार निधीतून कोटींची मदत

prashant_c

जगभरात 10 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

पश्चिम बंगाल : सरकारने पाचव्यांदा केले लॉक डाऊनच्या नियमात बदल

pradnya p
error: Content is protected !!