तरुण भारत

‘वंदे भारत मिशन’ : परदेशात अडकलेल्या 6 हजार 37 भारतीयांची घरवापासी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

लॉक डाऊनमुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारच्या वतीने ‘वंदे भारत मिशन’ नावाने मोहीम सुरू करण्यात आली आहे. या ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत आता पर्यंत 31 उड्डाणांद्वारे परदेशात अडकलेल्या 6 हजार 37 भारतीयांची घरवापासी झाली आहे. 


नागरी उड्डाण मंत्रल्याद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात विदेशात अडकलेल्या  6 हजार 37 नागरिकांना भारतात आणण्यात आले आहे. 

पुढे ते म्हणाले, पहिल्या टप्प्यात 14 हजार 800 नागरिकांना मायदेशात आणण्याची योजना बनवली आहे. विदेशातून अडकलेल्या आता पर्यंत 6 हजार 37 मधील ब्रिटनमध्ये अडकलेले 331 नागरिकांना आजच्या दिवशी हैदराबाद मध्ये आणण्यात आले. तर फिलिपिन्स मधून आज 139 भारतीयांना अहमदाबादमध्ये सोडण्यात आले. 


दरम्यान, वंदे भारत मिशन अंतर्गत एअर इंडिया आणि त्यांनी सहाय्यक एअर इंडिया एक्सप्रेस 12 देशांमध्ये 64 विमानाचे उड्डाण करत आहे. यामध्ये अमेरिका, लंडन, बांगलादेश, सिंगापूर, साऊदी अरब, यु ए ई, फिलिपिन्स, कुवैत, मलेशिया आदी देशांचा समावेश आहे. 

Related Stories

दिल्लीत कोरोना बाधितांनी ओलांडला 6.17 लाखांचा टप्पा

pradnya p

सातारा शहर, परिसरात पाच बाधित

triratna

अमेरिकेत कोरोनाबाधितांनी गाठला 55 लाखाचा टप्पा

datta jadhav

सोलापूरची चिंता वाढली; दिवसभरात ११ नवे रुग्ण, पाचवा मृत्यू

Shankar_P

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या रंगपंचमीच्या शुभेच्छा!

tarunbharat

महाराष्ट्रात 8,232 रुग्ण कोरोनामुक्त; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.71 %

pradnya p
error: Content is protected !!