तरुण भारत

राशिभविष्य

पैशाचा अपमान  म्हणजे  दरिद्रय़ाला निमंत्रण …

बुध. 13 ते 19 मे 2020

Advertisements

हल्ली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठे ना कुठे रस्त्यावर टाकलेल्या नोटा व्हॉटस ऍपवर दिसून येतात. त्या व्हायरसयुक्त असल्याच्या संशयाने कुणी हात लावत नाहीत. पैशाचा असा अपमान केलात तर खायला अन्नही मिळणार नाही, हे लोकांनी लक्षात ठेवावे. आपले जीवन या पैशावरच अवलंबून असते. जर हाती पैसा नसेल तर कुणीही विचारत नाही. कोरोनामुळे मृतांच्या आकडा वाढल्यावर या पैशाचा उपयोग काय, असा विचार करून इटली देशात गल्लोगल्ली रस्त्यावर नोटा व इतर किमती चिजा लोकांनी फेकून दिल्याचे दिसून आले. शेतीमालाला योग्य दर मिळत नाही, म्हणून त्यावर नांगर फिरवणे, एखादे आंदोलन यशस्वी व्हावे म्हणून टँकरमधील दूध रस्त्यावर फेकून देणे, रात्री उरलेले अन्न सकाळी कचऱयात टाकणे, मुक्मया प्राण्यांचे अन्नपाणी बंद करणे, त्यांचे हाल करणे, पगार चांगला असूनही अधिकाराचा गैरवापर करून भ्रष्टाचार करणे, अमुक द्या, तमुक द्या, अशी मागणी करणे असे प्रकार अनेकजण करीत असतात. ज्या व्यक्तीमुळे आपले जीवन चालते, कुटुंबाचे पालन पोषण होते, त्या मालकाला फसवणे, अशामुळे लक्ष्मीचा कोप होतो व शेवटी दारिद्रय़ येते, उद्योग धंदे बंद पडतात, चांगल्या नोकऱया सुटतात, घरात व्यसनांचा शिरकाव होतो, नको ते आजार सुरू होतात व सर्व बाजूने त्रास वाढतात. अपघात करून एखादी व्यक्ती पळून जाते व सापडलीच तर नुकसान भरपाई देण्याचे टाळते व आपण कसे सुटलो, या आनंदात रहाते, पण नियतीचे सर्वावर अत्यंत बारीक लक्ष असते. आज ना उद्या त्याचे अनिष्ट फळ भोगावे लागणार याची खूणगाठ मनाशी बांधणे आवश्यक आहे. पैसा कितीही मिळाला तरी तो टिकत नाही, काय करावे ते कळत नाही, असे अनेकजण म्हणत असतात. आपले काय चुकले, आपल्या हातून कळत नकळत कुणाचा अपमान तर झालेला नाही ना, देवाधर्माच्या बाबतीत उलटसुलट काही ती टीकाटीपणी केली आहे का याचा अंतर्मुख होऊन विचार केल्यास बऱयाच प्रश्नांची उत्तरे सापडतात. ज्या पैशावर आपले जीवन चालते त्या पैशाशी कधीही मस्ती करू नये, शक्मयतो पैशाशी खेळणे टाळावे. अनैतिक मार्गातील पैसा कसा व कधी जाईल सांगता येणार नाही. हल्ली वास्तुशास्त्राच्या जाहिराती, चर्चासत्रेs, अभ्यासक्रम व फेंगशुईच्या नावाखाली नको त्या वस्तू माथी मारल्या जातात. फेंगशुई हे शास्त्र चीनशी संबंधीत आहे. तेथील भौगोलिक रचनेशी ते अनुकूल असेल पण भारतास ते लागू पडत नाही. नको त्या वस्तू घरात ठेवल्यानेही हाती पैसा टिकत नाही. काही वास्तुशास्त्रज्ञ बऱयाच गोष्टी करण्यास सांगतात. पण नंतर त्याचा गुण न आल्यास त्याची जबाबदारी घेत नाहीत. कोणतेही शास्त्र वापरले तरी कष्टाशिवाय काहीही मिळणार नाही. लोकांच्या समस्या तसूभरही कमी झालेल्या नाहीत. फक्त मंत्र-तंत्र करून वास्तू शास्त्राप्रमाणे घर बांधून समृद्धी येत नसते तर त्यासाठी कष्टही करावे लागतात. लक्ष्मी का कोपते याची अनेक कारणे असतात. लग्नाच्यावेळीदेखील हुंडय़ासाठी किती बळी पडत असतात, हे आपण पहात असतात. हुंडय़ासाठी ज्यावेळी गृहिणीच्या अथवा तिच्या माता-पित्याच्या डोळय़ांतून अश्रू बाहेर पडतात. तेव्हाच लक्ष्मीचा कोप सुरू होतो व अवदसेचा प्रवेश होतो व त्याचे परिणाम पुढे दिसून येतात. आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी, त्याच्या नोकरी उद्योगासाठी आम्ही इतका पैसा खर्च केलेला आहे, असे सांगून हुंडा मागण्याचा प्रयत्न होतो, पण मुलगा तुमचा आहे. त्याच्या कल्याणासाठीच खर्च केलात, दुसऱयासाठी तर नाही ना.

मेष

रवि, बुध शुक्र धनस्थानी असल्याने पैसा बऱयापैकी मिळेल. पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. शापीत योगाच्या प्रवाहाने अचानक नुकसानपण होऊ शकते. कोणतेही काम विचारपूर्वक करावे, योग्य नियोजन करून कामे केल्यास आर्थिक भरभराटीच्या दृष्टीने अनुकूल फळे मिळतील. किरकोळ गुंतवणूक वगैरेस उत्तम. राशीस्वामी मंगळ लाभात आहे. कोणतेही धाडसी काम करा! यश मिळेल.

वृषभ

शुक्र, बुध, रवि योग तुमच्या राशीतच होत आहे. अनेक चांगली व फायदेशीर कामे होतील. कुटुंबिय व पाहुणेमंडळीसाठी खर्च करावा लागेल. ताणतणाव तसेच मनाविरुद्ध घटना घडू शकतात. रवि दूषित असल्याने नोकरी व्यवसायात सावधगिरी बाळगावी. कौटुंबिक जीवनात काही तरी गोंधळ माजण्याची शक्मयता.

मिथुन

शुक्र, बुध, रवि मोक्षस्थानी असल्याने कामे वेळेवर होतीलच याची खात्री नाही. त्यामुळे कितीही अडचणी आल्या तरी कामे पूर्ण करण्याचा विडा उचलावा लागेल. भाग्यातील मंगळ प्रवासात अडचणी दाखवितो. नोकरीत घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका. नोकरी व्यवसायात अचानक बदल, नको त्या ठिकाणी स्थलांतर वगैरेची शक्मयता. कोणतेही काम विचारपूर्वक करावे. काही प्रकरणे अंगलट येऊ शकतात.

कर्क

शुक्र, बुध, रवि लाभात आहेत. अचानक लाभ दर्शविणारा हा योग आहे. काही नवीन व्यवसाय सुरू केल्यास ते जोरात चालतील. घाईगडबडीत महत्त्वाच्या वस्तुची अदलाबदल अथवा मोडतोड होण्याची शक्मयता. त्यासाठी सावध रहावे. कौटुंबिक अडचणी कमी होतील. नवे संकल्प असतील तर ते पंधरवडय़ात पूर्ण होऊ लागतील.

सिंह

शुक्र, बुध, रवी दशमात हा एक प्रकारचा अमृत कार्यसिद्धी योग आहे. मनातील अनेक इच्छा पूर्ण करू शकाल. काही शिक्षणात यश, धनलाभ, नवेस्नेह संबंध जुळणे, विवाहाच्या वाटाघाटीत यश यांचा त्यात समावेश राहील. गुरु, शनिचा योग अशुभ षडाष्टकात आहे. शारीरिक व आर्थिक बाबतीत चांगला नाही. आरोग्याची काळजी घ्या. कोणत्याही व्याधी असतील तर त्याकडे दुर्लक्ष नको.

कन्या

शुक्र, बुध, रविचा योग भाग्यात होत आहे. मंगलकार्याच्या बाबतीत शुभ फळे मिळतील. मंगळ सहावा आहे. आर्थिक बाबतीत चांगला असल्याने आर्थिक व्यवहारांना चालना मिळेल. आतापर्यंत या ना त्या कारणाने खोळंबलेले महत्त्वाचे काम होईल, पण हा मंगळ आरोग्याला त्रासदायक आहे. बेसावध राहू नका.

तुळ

शुक, बुध, रविचा योग अष्टमात आहे तो तुम्हाला शुभ नाही. कोणतेही काम जपून करावे. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्यावी. कुणाच्याही भानगडीत पडू नये. काही कर्ज प्रकरणे मिटतील. जागेचे व्यवहार पूर्ण होऊ लागतील. जुन्या वस्तुंना चांगली किंमत येऊ लागेल. गुप्तशत्रुंच्या कारवायाकडे दुर्लक्ष करू नका.

वृश्चिक

बुध, रवि, शुक सप्तमात हा वैवाहिक जीवन, भागीदारी, कोर्टप्रकरणे व प्रवासावर प्रभाव  टाकणारा योग आहे. त्यामुळे चोहोकडे बारकाईने लक्ष ठेवून कामे करावीत. व्यवहारात काही विचित्र प्रकरणे निर्माण होतील. त्यातून उलट सुलट असे काही होणार नाही याची काळजी घ्या. कौटुंबिक जीवन व कमाई याबाबत बाहेरच्या व्यक्तींना काही सांगू नका. वास्तुत नवे बदल केल्यास काही दोष कमी होतील.

धनु

साडेसाती सुरू असल्याने कामात विलंब होऊ शकतो. सहाव्यास्थानी बुध, रवि, शुक्र हा योग सर्व बाबतीत शुभ आहे, पण कोणत्याही बाबतीत आततायीपणा मात्र नडेल. मंगळ तृतीयात काही अंशी शुभ आहे. पण शेजारी व नातेवाईक यांच्यामुळे नको त्या प्रकरणात अडकावे लागेल. जागा, स्थावर, इस्टेट या बाबतीत काही अडचणी निर्माण होण्याची शक्मयता आहे.

मकर

शुक्र, बुध, रवि योग पंचमात अशा योगावर नावलौकिक व व्यवहारात यश मिळण्याची दाट शक्मयता असते. काळजी घ्यावी. नोकरी, व्यवसायात काही चमत्कारीक घटना घडतील. मन शांत ठेवून निर्णय घ्यावेत. संततीस्थानी हा योग होत आहे.  मुलांच्या आशा-आकांक्षा पुरविताना वस्तुस्थितीचे भान ठेवावे लागेल. त्यांच्या वागणुकीवर लक्ष ठेवा. वाहन वगैरे मोठी वस्तू घेताना काळजी घेणे आवश्यक.

कुंभ

शुक्र, बुध, रवि चतुर्थात असल्याने घरगुती बाबतीत काही नवे धोरण आखले जाईल. दुरुस्ती व इतर बाबींसाठी बराच तिढा निर्माण होईल. लॉकडाऊनमुळे खर्च वाढल्याने कुटुंबात जरा नाराजी दिसून येईल. वैवाहिक जीवनात जर काही समस्या असतील तर त्या वाढवू नका. निष्कारण गैरसमज होतील. चंद्र, मंगळ लक्ष्मीयोगामुळे प्राप्तीचे नवे मार्ग दिसतील.

मीन

शुक्र, रवि, बुध तृतीयात असल्याने सर्व कामे मीच करून दाखवीन, असा उत्साह दाखवाल. मंगळ अशुभ असल्याने आरोग्य व मानसिक स्थितीवर परिणाम होईल. काळजी घ्या. डोळय़ांचे विकार उद्भवतील. टोकदार वस्तुपासून जपावे. कोणतेही निर्णय जपून घ्यावेत. महत्त्वाच्या शुभ कामांचा शुभारंभ कराल. आर्थिक स्थितीही सुधारेल.

Related Stories

आजचे भविष्य मंगळवार दि. 22 जून 2021

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 5 ऑक्टोबर 2020

Patil_p

आजचे भविष्य 04-06-2021

Amit Kulkarni

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 13 ऑगस्ट 2020

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 7 सप्टेंबर 2021

Patil_p
error: Content is protected !!