तरुण भारत

त्याला जीवदानही मिळाले अन घर देखील

चंद्रकांत देवरुखकर/ सातारा

कोरोना संसर्गामुळे सुरु असलेला लॉकडाऊन आणि त्यातच सांगलीचा एक 33 वर्षीय तरुण घरात भांडण झाल्याने बाहेर पडला. मानसिक तणावातून भरकटत तो चालत चालत कोरेगाव तालुक्यातील किन्हईत पोहोचला. तिथे प्राथमिक आरोग्य केंद्राने त्याला कोरोना संशयित म्हणून सातारा जिल्हा रुग्णालयात पाठवला. तो काहीही बोलत नव्हता. शुदैवाने त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर त्याच्यावर उपचार करुन कोरोनाच्या घमासान युध्द घाईत देखील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या सांगलीतील घरी पोहोचवण्यात यश आले.

Advertisements

येथील जिल्हा रुग्णालय सातारा येथे 16 एप्रिलच्या मध्य रात्री किन्हई प्राथमिक आरोग्य केंद्रावरुन साधारण 33 वय वर्ष असणार तरुण कोरोना संशयित म्हणून दाखल झाला. यांच्याबरोबर कोणीही नातेवाईक नव्हते प्राथमिक आरोग्य केंद्राने या रुग्णांची सातारारोड पोलीस स्टेशनला एम.एल.सी नोंद केली होती. त्यांचा कोविड 19 तपासणी अहवाल येणे बाकी होते. तो रुग्ण दाखल असताना त्यांने वार्डमध्ये स्वतःच्या हाताला ब्लेडच्या पानाने जखम करुन घेत त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता.

इतर रुग्णांच्या सांगण्यावरून याला मानसिक आजार असल्याची शंका उपलब्ध झाली. या रुग्णाला मानसिक उपचार देणे गरजेचे होते. पण जिल्हारुग्णालय सातारा येथील मानोसोपचार तज्ञ डॉ. मस्कर यांची प्रतिनियुक्ती ही आरोग्य भवन मुंबई येथे असल्यामुळे या मनोरुग्णांवर उपचार करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे खाजगी मानोसोपचारतज्ञ डॉ अभिजित घोरपडे यांना दाखवून मानसिक उपचार सुरु करण्यात आले.

त्याच्या नातेवाईकांचा शोध घेणे आवश्यक असल्याने मग त्याच्याजवळ असणाऱया सामनाची तपासणी केल्यानंतर त्यांच्या जवळ डायरी मिळाली.  त्यावरून त्यांच्या आईशी संपर्क झाला. या रुग्णांच्या आईने सांगितले की, आम्ही सांगली येथे राहत असून त्याने भांडण करुन घर सोडले. एकतर्फी प्रेमातुन त्याला मानसिक आजार झाला असून त्याला प्रादेशिक मनोरुग्णालय पुणे येथील औषधे चालू होती तो वेळेवर औषधे घेत नसल्याची माहिती मिळाली.

जिल्हा रुग्णालयातील मानसिक विभागातील समुपदेशक संदीप मंगरुळे, श्रीमती क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट सीमा वाघमारे, सायकॅट्रिक ब्रदर भाटे यांच्या मार्फत  रुग्णांवर वारंवार समुपदेशन व औषध उपचाराचा पाठपुरावा करुन त्यांची मानसिक स्थिती सुधारण्यास मदत मिळाली. याच वेळी त्याचा कोरोना अहवाल देखील निगेटिव्ह आल्याने त्याला घरी पाठवण्यासाठी गीता कारंजकर व समाजसेवा अधिक्षक सचिन थिटे यांनी प्रयत्न केले.

लॉकडाऊन असतानाही केले घरपोहोच

या रुग्णाला इतरवेळेस घरी सोडणे शक्य झाले असते पण या लॉकडाऊनच्या काळात ते ही सांगली येथे सोडणे हे कठीणच होते. कारण दोन्ही जिल्हयातील जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत परवानगी मिळाल्यावरच रुग्ण घरी पाठवणे शक्य होणार होते. त्यानुसार समाजसेवा अधिक्षकांनी वारंवार दोन्ही जिल्हाधिकारी कार्यालयाचा पाठपुरावा करुन त्यांच्याकडून रुग्ण घरी सोडण्याची परवानगी देण्यात आली. यासाठी जिल्हा कार्यालय सातारा येथील हेल्पलाईन कॉर्डीनेटर श्रीमती प्राची मोरे यांची मदत झाली.

आणि तो सुखरुप सांगलीत पोहोचला

दि. 6 मे रोजी बुधवार रोजी बरा झालेल्या रुग्णाला रुग्णवाहिकेतून येथील समाजसेवा अधिक्षक सचिन थिटे, परिचर काळे, व चालक राकेश यादव यांच्या समवेत त्याच्या राहत्या घरी सांगली येथे त्यांच्या आईवडिलांकडे सुखरुप ताब्यात देण्यात आले. आपला मुलगा सुखरुप घरी आला हे पाहून रुग्णांच्या आईवडिलांच्या चेहऱयांवरील आनंद हा पाहण्याजोगा होता. रुग्णांचे जिल्हा रुग्णालय सातारा येथे दाखल झाल्यापासून ते त्याच्या घरी पुर्नवसन होईपर्यत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अमोद गडीकर व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांनी दाखवलेली माणुसकी दिलासादायक ठरली.

Related Stories

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचे निधन

Patil_p

पाऊस थांबला, सातारकरांना उन्हाचा चटका

Patil_p

एस.टी.महामंडळाच्या वाहकास मारहाण

Amit Kulkarni

मनसेच्या रुपाली पाटील यांनी घेतली उदयनराजे यांची भेट

Abhijeet Shinde

ग्रामपंचायतीच्या निवडणूकांना स्थगिती

Patil_p

तृतीय पंथीचा पोलीस भरतीसाठी साताऱ्याच्या मातीत सराव

datta jadhav
error: Content is protected !!