ऑनलाईन टीम / मुंबई :
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून निश्चित करण्यात आलेला चौथा उमेदवार बदण्यात आला आहे. भाजपचे चौथे उमेदवार अजित गोपछडे यांनी माघार घेतल्याने लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी 11 मे ही अर्ज दाखल करण्याची तारीख होती. गोपछडे यांनी अर्ज मागे घेतल्याने काल रमेश कराड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
विधान परिषदेच्या 9 जागांसाठी महाविकास आघाडीला 5 तर भाजपला 4 जागा आहेत. महाविकास आघाडीतील शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना उपनेत्या निलम गोऱ्हे, राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी तर काँग्रेसकडून राजेश राठोड यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. भाजपकचे रमेश कराड, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते-पाटील हे उमेदवार आहेत.