तरुण भारत

धक्कादायक! कोरोनाची लागण झालेल्या जवानाने झाडाला लटकून केली आत्महत्या

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस अधिकच वाढत चालली आहे. दिल्लीत देखील चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच एका कोरोना संक्रमित जवानाने आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, या जवानाला कोरोनाची बाधा झाली होती. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. 12 मे रोजी या जवानाने पहाटे चारच्या सुमारास रुग्णालयातील वॉर्डच्या मागील झाडावर नायलॉन दोरीच्या सहाय्याने लटकून आत्महत्या केली. 


दरम्यान, या जवानाला फुफ्फुसाचा कर्करोग झाला होता. लष्कराच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. जवानाचा कोरोना चाचणीचा अहवाल पाठवला असता, तो पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. या जवानाला 5 मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 


पोलिस उपायुक्त दीपक पुरोहित म्हणाले की, आम्हाला या घटनेची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी पोहचलो असता या जवानांची बॉडी रुग्णालयातील वॉर्डच्या मागील झाडाला नायलॉन च्या दोरीने लटकलेले मिळाले. मात्र घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट नाही मिळाली. पोलिस म्हणाले, मृत जवानाचे कुटुंब राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात राहते. त्यांनाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. 

Related Stories

मध्य प्रदेशातील 462 गावांमधील 951 जणांना कोरोना, 32 जणांचा मृत्यू

pradnya p

ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आई मॅक्स रुग्णालयात दाखल

datta jadhav

चीनमध्ये महापूर; गर्भवतीने वाहत्या पाण्यात टायरवर दिला बाळाला जन्म

datta jadhav

वायू प्रदूषण रोखण्यासाठी कठोर कायदा

Patil_p

जगभरात अडकलेल्या 14 हजार भारतीयांची होणार घरवापसी

datta jadhav

सांगली जिल्हय़ात विक्रमी 106 रूग्ण वाढले

triratna
error: Content is protected !!