तरुण भारत

वुहानमध्ये होणार सर्वांचीच कोरोना टेस्ट

ऑनलाईन टीम / बीजिंग : 

चीनच्या वुहान शहरात 36 दिवसानंतर पुन्हा कोरोनाचे सहा रुग्ण आढळून आल्याने तेथील आरोग्य प्रशासनाने शहरातील सर्व नागरिकांची कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. वुहानमधील प्रत्येक जिल्ह्याने दहा दिवसांच्या आत योजना आखून सर्व नागरिकांची चाचणी करावी, असे तेथील आरोग्य प्रशासनाने काढलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. 

चीनच्या हुबेई प्रांतात असलेल्या वुहान शहराची लोकसंख्या 1 कोटी 10 लाख आहे. याच शहरापासून कोरोना जगभर पसरला. मागील महिन्यात कोरोनाला रोखण्यात चीनला यश आले होते. मात्र, 36 दिवसानंतर वुहानमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून, ही शहरातील कोरोनाची दुसरी लाट असल्याची चिन्हे आहेत.

आतापर्यंत चीनमध्ये 82 हजार 826 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 4633 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील 36 दिवसांपासून तिथे कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नव्हता. शनिवारी वुहानमधील सन्मिन भागात कोरोनाचा एक रुग्ण आढळला. त्यानंतर रविवारी पुन्हा पाच नव्या रुग्णांची नोंद झाली.

Related Stories

महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांची जयंती घरीच साजरी करा : प्रकाश आंबेडकर

prashant_c

पाक : 4044 नवे रुग्ण

Patil_p

अमेरिकेत दिलासा शक्य

Patil_p

जम्मू-काश्मीरमध्ये एका दिवसात 162 नवे कोरोना रुग्ण, एकूण संख्या 1922 वर

pradnya p

ट्रम्पपुत्रालाही लागण

Patil_p

‘हरियाणा फ्रेश’ नावाने बॉटल बंद पाणी तयार करणार सरकार

pradnya p
error: Content is protected !!