तरुण भारत

दिल्ली : एकाच दिवसात 5 पोलिसांना कोरोनाची लागण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

कोरोना संकटात आपला जीव जोखमित घालून रात्रंदिवस कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी कोरोनाचे शिकार बनत चालले आहेत. संचारबंदी सुरू झाल्यापासून दिल्लीमध्ये जवळपास 135 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एका दिवसात पाच पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत माहिती देताना दिल्ली पोलिस प्रवक्ते रणदीप सुरजेवार यांनी सांगितले की, वेगवेगळ्या जिल्ह्यातील ड्युटीवर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे.

यामध्ये एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. ते ओखला पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. अन्य दोघेजण वजिराबाद पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. इतर दोघांपैकी एक मंदिरमार्ग व कमला मार्केट पोलिस स्थानकातील कॉन्स्टेबल ला संक्रमण झाले आहे. 


दरम्यान, पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये वाढत चाललेले संक्रमण पहाता पोलीस प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांसाठी सहा विशेष रुग्णवाहिन्यांची सुविधा सुरू केली आहे. सर्व प्रकारच्या इमर्जन्सी पिझ्झा सुविधांसाठी त्याचा वापर केला जात आहे. 

Related Stories

अभिषेक बच्चन याची कोरोनावर मात!

pradnya p

मध्य प्रदेश : मंत्री अरविंद भदौरिया यांना कोरोनाची बाधा

pradnya p

आसामच्या एनडीएफबीशी शांतता करार

Patil_p

दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात 1 जुलैपासून सुरू होणार ओपीडी सेवा

pradnya p

राजस्थान पाठोपाठ महाराष्ट्रातही पतंजलीच्या कोरोनिलला बंदी

pradnya p

कोरोनावरील उपचारासाठी ‘रेमडेसिवीर’ची शिफारस करता येणार नाही : WHO

datta jadhav
error: Content is protected !!