तरुण भारत

झारखंडमध्ये प्रसूतीपूर्वी होणार 50 हजार गर्भवती महिलांची कोरोना टेस्ट

ऑनलाईन टीम / रांची :

देशात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. यातच झारखंडच्या हेमंत सोरेन सरकारने गर्भवती महीलांसाठी मोठी योजना तयार केली आहे. या योजनेनुसार, झारखंडमध्ये प्रसूतीच्याआधी 50 हजार गर्भवती महिलांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत हा निर्णय घेतला गेला आहे. मे महिन्यात ज्या महिलांनी प्रसूती होणार आहे. त्या महिलांची प्रसूतीच्या 15 दिवसआधी कोरोना टेस्ट केली जाणार आहे. 


झारखंड राज्यात मे महिन्यात 51 हजार 933 गरोदर महिलांची प्रसूती होणार आहे. या योजनेची सुरुवात रांचीतील नामकुममधून झाली आहे. रांचीमध्ये जवळपास 3 हजार 500 महिला गर्भवती असून त्यांची टेस्ट केली जाणार आहे.

आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही समस्या उद्भवू नये म्हणून हेमंत सरकारने ही योजना आखली आहे. 

Related Stories

राज्यात 308 नव्या रुग्णांची भर

Patil_p

दिल्लीत दिवसभरात 1808 नवे कोरोना रुग्ण; 20 मृत्यू

pradnya p

हिमाचल प्रदेश : ऊर्जामंत्री सुखराम चौधरी यांना कोरोनाची लागण

pradnya p

पाकिस्तानातील कोरोनाबाधितांची संख्या 21 हजारांपार

datta jadhav

देशाच्या इंचभर जमिनीवर कोणी वाकडी नजर टाकू शकत नाही

datta jadhav

जगभरातील कोरोनाबळींची संख्या 8 लाखांवर

datta jadhav
error: Content is protected !!