तरुण भारत

शिकारीसाठी गावठी देशी बंदुका बनविणारी टोळी गजाआड

पाच संशयितांना अटक : फोंडा पोलिसांची कामगिरी : 5 बंदुकासह, 7 काडतुसे, 11 दस्ते, 24 नळय़ा जप्त

प्रतिनिधी / फोंडा

Advertisements

बोरी व शिरोडा येथे देशी बनावटीच्या गावठी बंदुका निर्मिती, विक्री व विनापरवाना बाळगल्यापकरणी पाच संशयिताना फोंडा पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. संशयिताकडून रू. 1 लाख किमतीच्या बंदुका, 7 जीवंत काडतुसे, 11 बंदुकाचे दस्ते तसेच 24 बंदुकाच्या नळया जप्त करण्यात आल्या आहेत. सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. ात मुद्देमालासह पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे.

रविवारी 10 मे रोजी उशिरा रात्री पोली उर्फ रूजारीयो फर्नाडीस नामक संशयिताला अटक केल्यानंतर सदर घटनेचा पर्दाफाश झाला आहे. मागील काही वर्षापासून सक्रिय असलेल्या या टोळीचा बिमोड करताना फोंडा पोलिसांनी चोवीस तासाच्या आत सर्व संशयिताना अटक करण्यात यश मिळवले आहे. पोलिसांनी अटक करण्यता आलेल्या संशयितामध्ये मास्टर माईंड निरज बाबल च्यारी (41, टॉप कोला-बोरी) हा आहे. त्याचा मुख्य साथीदार पोली उर्फ रूजारियो फर्नाडीस (52, हडय़ामळ-शिरोडा) तसेच बंदुका विकत घेतलेले वासुदेव विष्णू गावकर (40, रा. चिकनगाळ-शिरोडा), विश्वास उर्फ बोमी भिसो वेळीप (53,पाज-शिरोडा), विनोद पांडुरंग शिरोडकर (55, शिरोडा) अशी पाचही संशयितांची नावे आहेत.

मुख्य साथीदार असलेला पॉली फर्नाडीस याला फेंडा पोलिसांनी शिकारीला जात असताना तोर्ल शिरोडा येथे दुचाकीसह रविवारी 10 मे रोजी उशिरा रात्री 3 वा. सुमारास अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे बंदुक व काडतूस सापडल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणाचा पर्दाफाश झाला होता. सदर घटनेचे टॉप कोला कनेक्शनही उघड झाले होते. फोंडा शहराजवळच गावठी बंदुक निर्मीतीचा प्रकार होत होता. च्यारी यांनी विनापरवाना बंदुका बनविण्याचा अड्डा बनविण्यात आला होता. त्य़ाच्याजवळ एक बंदुक, 11 दस्ते, 24 नळय़ा व एक काडतूस जप्त करण्यात आली. अन्यजणाकडून एक बंदुक व जीवंत काडतूसे आढळल्या आहेत. लॉकडाऊन काळात सर्व सरकारी यंत्रणा व्यस्त असल्याचे संधी साधून वन्य जनावरांच्या शिकारीचे प्रकार सुरू होते.

वन्य प्राण्याची शिकारीसाठी उपयोग

वन्य प्राण्य़ाच्या शिकारीसाठी या बंदुका बनवून विक्री केल्याचा संशय फोंडा पोलिसांनी वर्तविला आहे. सदर बंदुका बनविणारा संशयित च्यारी हा पेशाने कारागिर असून लेथ मशिनच्या वापराने किंवा इतर सुटे भाग जुळवून गावठी देशी बनावटीच्या बोअर बंदुका तयार करीत होता यादिशेनेही तपास सुरू आहे. संशयिताकडून जप्त करण्यात आलेल्या पाच बंदुकामध्ये एक डबल बोअर व अन्य चार सिंगल बोअर बंदुकांचा समावेश आहे. बोरी व शिरोडा भागात विनापरवाना बंदुका वापरणाऱयांचा सुगावा  पोलिसांन लागला असून येत्या दिवसात त्यांनाही अटक होण्याची शक्यता आहे.

फोंडय़ात 336 परवानाधारक तर शिरोडय़ात 80

फोंडा तालुक्यात एकूण 336 बंदुका परवानाधारक असून ग्रामिण भागात बागायतीच्या सुरक्षिततेसाठी अनेकाकडे विनापरवाना बंदुका असण्याचा संशय आहे. शिरोडा मतदार संघात एकूण 80 परवानाधारक बदुका आहेत. सदर इसम देशी बनावटीची बंदुका स्वतः बनवून विक्री करीत असल्याची टीप फोंडा पोलिसांनी मिळाली होती त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. संशयिताविरोधात विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी 3 व 25 कलमाखाली गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तत्परतेने केलेल्या कारवाईमुळे सर्वत्र कौतुक होत आहे.  

निराक्षक मोहन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अजित उमर्ये, आदित्य वेळीप, सुरज काणकोणकर, महिला उपनिरीक्षक रश्मी भाईडकर, हवालदार केदारनाथ जल्मी, समीर पाटील, जितेंद्र गावडे, हनुमंत बोरकर, संदीप नाईक, अमेय गोसावी, वंदेश सतरकर, साईनाथ कोपर्डेकर, सिद्धेश गावस व महेश गावडे यांनी ही कारवाई केली.

Related Stories

‘तिसऱया-कालवे’ पकडणाऱयांकडून सोशल डिस्टन्सिंगचा आदर्श

Omkar B

डिचोलीची वैशिष्टय़पूर्ण घोडेमोडणी साजरी.

Amit Kulkarni

ऑनलाईन शिक्षणाची मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत

Patil_p

कामगार निधी घोटाळा प्रकरण आता एसीबीकडे

Patil_p

मडगाव नगरपालिकेत लोकांची गर्दी

Omkar B

नव्याने बांधण्यात आलेल्या विहिरीचे उद्घाटन करण्यासाठी सरपंच, आमदारांची धाव

tarunbharat
error: Content is protected !!