तरुण भारत

दिल्ली : लग्नाच्या वाढदिवशी पतीने शुभेच्छा न दिल्याने पत्नीने घेतला गळफास

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

सगळीकडे कोरोना संकट फैलावत असतानाच दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. दिल्लीतील शाहदरा जिल्ह्यातील मानसरोवर पार्क परिसरात एका महिलेने पतीने लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा न दिल्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव आकांक्षा असून ती 27 वर्षांची होती. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, त्यांना कुठलही सुसाईड नोट मिळाली नाही आहे. याबाबत माहिती देताना पोलिस म्हणाले, अकांक्षा आपल्या परिवारासोबत नथ्यू कॉलनीमध्ये रहात होती. ती एका सरकारी स्कूलमध्ये नोकरीला होती तर तिचा पती एका खाजगी कंपनीत अकाउंटचे काम करतो. 11 मे 2018 रोजी या दोघांचा विवाह झाला होता.

मात्र, यावर्षी पतीने लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा न दिल्याने नाराज झालेल्या आकांक्षाने स्वतःला गळफास लावून घेतला. 


त्यातच आकांक्षाच्या माहेरच्यांनी मात्र, आकांक्षाचा हुंड्यासाठी छळ केला जात असे, तसेच मुल होत नसल्याने तिला टोमणे मारत असत, असा आरोप केला आहे. 


दरम्यान, मंगळवारी पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्यानंतर अकांक्षाचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला असून  पोलिसांकडून या सर्व प्रकारचा तपास सुरू आहे. 

Related Stories

नातीनं आजीचं नाक कापलं : परेश रावल

pradnya p

कोरोनाविरोधी लसीकरण आता दृष्टीपथात

Patil_p

यूएईने केल्या लोकसंख्येपेक्षा अधिक कोरोना चाचण्या

datta jadhav

सोलापुरात आज 49 कोरोनाबाधित रुग्णांची भर, 6 जणांचा बळी

triratna

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 15,048 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज

pradnya p

कोरोना संकटात बिहारमध्ये रणधुमाळी

Patil_p
error: Content is protected !!