तरुण भारत

पंतप्रधानांनी काल ‘हेडलाईन आणि कोरे पान’ दिले : पी चिदंबरम

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना 20 लाख कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली. या घोषणेनंतर या निर्णयाचे काही जणांनी स्वागत केले तर काही जणांकडून कडाडून टीका होत आहे. त्यातच काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांनी ट्विट करत यावर टीका केली आहे. 


ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेले पॅकेज म्हणजे ‘केवळ हेडलाईन आणि कोरे पान’ आहे अशी टीका केली आहे. 


ते आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, पंतप्रधानांनी काल आपल्याला हेडलाईन दिली आणि कोर पान दिले आहे. स्वाभाविकपणे माझी प्रतिक्रियाही तशीच कोऱ्या पानासारखी असणार आहे.

आज आपण ते कोरे पान अर्थमंत्री कसं करतात ते पाहू. अर्थव्यवस्थेकडे सरकार कडून जे पैसे ओतले जाणार आहेत, त्यातला प्रत्येक आतिरिक्त रुपयावर आमचे बारीक लक्ष असणार आहे. तसेच कोणाला काय मिळणार याचा देखील आम्ही बारीक अभ्यास करू. असं ही यावेळी म्हणाले.


तसेच हजारो मजुर आपल्या घराकडे स्थलांतर करत आहेत त्यांना या पॅकेज मधून काय मिळते याकडेही आमचे लक्ष असणार आहे. असं ही त्यांनी यावेळी म्हटले आहे. 

Related Stories

सीमाभागात बारकाईने लक्ष ठेवणार ‘भारत’ ड्रोन

datta jadhav

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात नाशिकचे सुपुत्र शहीद

datta jadhav

राहुल गांधी ‘अकार्यक्षम’ बराक ओबामांचे विधान

Omkar B

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना कोरोनाची बाधा

pradnya p

रुग्णवाहिका चालकांचे काम बंद आंदोलन

triratna

भारतालाही होतेय अनेक देशांची मदत

Patil_p
error: Content is protected !!