तरुण भारत

बाजारपेठेतील वाहतुकीची कोंडी चिंताजनक

 प्रतिनिधी / बेळगाव :

शहरात काही अंशी शिथिलता देण्यात आल्याने बाजारात नागरिकांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे ठिक-ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. खरेदीसाठी नागरिकांची वाढत असलेली गर्दी कोरोना संसर्गाच्या दृष्टीकोनातून चिंताजनक आहे.

Advertisements

लॉकडाऊनमुळे साधारण दीड महिन्यापासून बाजारपेठ बंद होती. मात्र  काही अंशी शिथिलता देताच गेल्या आठवडय़ापासून खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढलेली पहायला मिळत आहे. बुधवारी रविवारपेठमधील कलमठ रोडवर वाहतूक कोंडी झाली होती. रविवारपेठसह मारूती गल्ली, नरगुंदकर भावे चौक, रामदेव गल्ली आदी ठिकाणी वाहतूक वाढली होती. बाजारात येणारे नागरिक तोंडाला मास्क वापरत असले तरी संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळणे गरजेचे आहे. याबरोबरच बाजारात कपडय़ाची दुकाने देखील सुरू झाल्याने नागरिकांची वर्दळ वाढलेली पहायला मिळत आहे.

एकीकडे प्रशासन सोशल डिस्टन्सिंग नियम पाळा असे आवाहन करत आहे. दुसरीकडे मात्र बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पहायला मिळत आहे. दिवसेंदिवस गर्दी वाढत असून वाढती गर्दी सद्य परिस्थितीत धोकादायक आहे. रस्त्यावरील गर्दी टाळण्यासाठी बॅरीकेड्स लावून बंदोबस्त करण्यात आला आहे. त्यामुळे इतरत्र रस्त्यांवर वाहतुकीचा ताण पडत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. लॉकडाऊनमुळे अर्धवट स्थितीत असलेल्या रस्त्यांचे काम देखील हाती घेण्यात आले आहे. स्मार्ट सिटीच्या योजनेंतर्गत चन्नम्मा सर्कलमध्ये कॉंक्रीटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे चन्नम्मा सर्कलपासून काकतीवेसकडे जाणारी वाहतूक बॅरीकेड्स लावून बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे बाजारात येणाऱया नागरिकांना इकडून तिकडून फिरत रविवारपेठ गाठावी लागत आहे.

Related Stories

फोटो व्हिडिओग्राफर्सच्या नूतन कार्यकारिणीची निवड

Amit Kulkarni

इच्छा नसेल तर कन्नड विषय घेऊ नका

Amit Kulkarni

अकरावी पुनर्परीक्षेचा निर्णय 17 मे नंतर

Patil_p

आरपीडी पीयू कॉलेज ऑफ आर्ट्स ऍन्ड कॉमर्समध्ये नूतन विद्यार्थ्यांचे स्वागत

Amit Kulkarni

किसान रेल्वेतून 56 टन कृषी उत्पादनाची वाहतूक

Patil_p

भगवेमय वातावरणात दुर्गामाता दौड

Amit Kulkarni
error: Content is protected !!