ट्विटरचे कर्मचारी महामारीदरम्यानच नव्हे तर भविष्यातही स्वतःच्या इच्छेनुसार घरातून काम करू शकतील. कर्मचारी घरातून काम करण्याच्या स्थितीत असेल आणि त्याची कायमस्वरुपी अशीच स्थिती रहावी अशी इच्छा असल्यास ती पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे ट्विटरने म्हटले आहे. याचबरोबर कंपनीच्या कार्यालयांमध्ये काम करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. ट्विटर सप्टेंबरपूर्वी स्वतःचे कार्यालय सुरू करणार नाही. तसेच काही अपवाद वगळल्यास कुठल्याही प्रकारचा व्यावसायिक दौरा होणार नाही.


previous post
next post