तरुण भारत

अपहरण प्रकरणी आणखी एकाला अटक

मालमत्ता हडपण्यासाठी केले होते ब्रम्हचाऱयाचे अपहरण

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

ब्रम्हचाऱयाची कोटय़ावधी रुपयांची मालमत्ता हडप करण्यासाठी त्याचे अपहरण करुन तब्बल अडीच महिने त्याला एका फार्महाऊसमध्ये कोंडून ठेवण्यात आले होते. या प्रकरणी मार्केट पोलिसांनी बुधवारी आणखी एका आरोपीला अटक केली आहे.

विनायक शरत सावंत (वय 45, रा. चिदंबरनगर) असे त्याचे नाव आहे. मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व त्यांच्या सहकाऱयांनी बुधवारी विनायकला अटक केली आहे. भा.दं.वि. 143, 147, 365, 384, 120(बी), 344, 323, 504, 506 सहकलम 149 अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करुन विनायकला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरुन त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या दहावर पोहोचली असून पोलिसांनी आणखी काही जणांची चौकशी सुरु केली आहे.

भांदुर गल्ली येथील आण्णासाहेब श्रीकांत चौगुले (वय 57) यांचे 23 फेब्रुवारी रोजी अपहरण करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांच्या काकाने आण्णासाहेब बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती. मात्र आण्णासाहेब यांचे अपहरण झाल्याचे उघडकीस येताच मार्केट पोलिसांनी 9 जणांना अटक करुन अपहरनाटय़ उघडकीस आणले होते. कोटय़ावधी रुपयांची मालमत्ता हडप करण्यासाठी या टोळीने आण्णासाहेब यांचे अपहरण केल्याचे उघडकीस आले होते.

Related Stories

विलासकाका उंडाळकर प्रतिष्ठानची घोषणा

Omkar B

कोरोनाने आणखी चौघा जणांचा बळी

Amit Kulkarni

बेळगाव वनविभागात होतेय वन्यप्राण्यांचे संवर्धन

Amit Kulkarni

शास्त्री नगरातील ‘त्या’ नाल्याची मनपाकडून स्वच्छता

Amit Kulkarni

मंत्री जोल्ले यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

Patil_p

सरत्या वर्षात चित्रलोकमध्ये दोन वेधक कार्यक्रम

Patil_p
error: Content is protected !!