तरुण भारत

ओलिव्ह रिडले ‘’या दुर्मिळ सागरी कासवाच्या पिल्लांचे यशस्वी जलावतरण

मोरजी/प्रतिनिधी

मोरजी समुद्रकिनाऱयावर बुधवारी ‘’ओलीव्ह रिडले ‘’या दुर्मिळ होत चाललेल्या समुद्र कासवांच्या पिल्लांचे यशस्वी जलावतरण करण्यात आले. यासंदर्भात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी एक व्हीडीओ पोस्ट केला असून त्यानुसार मोरजी समुद्र किनार्यावर वनखात्याने आरक्षित केलेल्या  सागरी कासव संवर्धन केंद्राच्या जागेत ओलिव्ह रिडले जातीच्या कासवांची अंडी सुरक्षित करण्यात आली होती या अंडय़ांतून नैसर्गिक रित्या जन्माला आलेली ही सागरी कासवांची पिल्ले वनखात्याच्या कर्मचार्यांनी यशस्वी रित्या समुद्राच्या पाण्यात सोडले

Advertisements

गोव्यातील गालजीबाग ,आगोंद या समुद्र किनाऱया प्रमाणे मोरजी ,मांदे समुद्र किनार्यावर सागरी कासवी येवून अंडी घालतात गोवा सरकारच्या वनखात्याने या सागरी कासवांचे जतन व संवर्धन करण्यासाठी  गेल्या काही वर्षापासून विशेष मोहीम  हाती घेतली आहे त्यानुसार मोरजी तेमवाडा समुद्रकिनाऱयावर  जागा आरक्षित करून सागरी कासवांची  अंडी सुरक्षित ठेवली जातात सागरी कासवे दरवषी या ठिकाणी येवून अंडी घालतात त्यातून 50 ते 55 दिवसात पिल्ले जन्माला येतात हा निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी देशी परदेशी पर्यावरण प्रेमी एकच गर्दी करतात त्यातून मोरजी समुद्र किनार्यावर पर्यावरणीय पर्यटन वाढीस लागले आहे

सरकारच्या या उपक्रमानुसार दुर्मिळ होत चाललेल्या या समुद्र कासवाच्या संखेत लक्षणीय वाढ झाली आहे कोरोनाच्या पाश्वभूमीवर समुद्रकिनारी भागात पर्यटक तसेच माणसांची हालचाल कमी झाल्याने ही सागरी कासवे बिनधास्त पणे समुद्र किनारी भागात स्वच्छंद पणे फिरत असल्याचे आढळून आले आहे ओरिसा राज्यातही या सागरी कासवांची संख्या झपाटय़ाने वाढत असून दुर्मिळ होत चालेली ही सागरी कासवे पुन्हा मोठय़ा प्रमाणात जन्माला येत आहेत अश्याच प्रकारे जन्माला आलेली ओलिव्ह रिडले जातीच्या सागरी कासव पिल्लांचे जलावतरण करण्यास गोवा सरकारच्या वनखात्याला यश आली आहे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी या वनकर्मचाऱयांचे अभिनंदन केले आहे.

Related Stories

समाजाने पुरोहितांचा जरूर विचार करावा

Patil_p

अपंग व्यक्तींकडे माणुसकीने पाहावे

Patil_p

कोरोना रुग्णसंख्या दोन हजार पार

Omkar B

कोरोना चाचणीचे प्रमाण वाढविणार

Patil_p

डिचोलीत बुधवारी 31 उमेदवारी अर्ज सादर

Amit Kulkarni

पेडणे तालुका उपजिल्हाधिकाऱयांशी विर्नोडा पंचायत मंडळाची चर्चा

Omkar B
error: Content is protected !!