तरुण भारत

नेसरी: माहिती लपवल्याबद्दल चौघांवर गुन्हा दाखल

नेसरी / प्रतिनिधी

नेसरी येथे कोरोना दक्षता समिती यांना कोणतीही पूर्व कल्पना न देता राजकोट गुजरात येथून आल्याबद्दल व गावात येऊनही माहिती लपविल्याबद्दल कुटुंब प्रमुख सुनिल बाबुराव पेडणेकर, शुभम सुनिल पेडणेकर, संतोष सुभाना नाईक ( तिघे रा. नेसरी) समृद्धी कपिल पोतदार (रा.राजकोट गुजरात) यांच्यावर नेसरी पोलिसांत गावकामगार तलाठी सुनंदा साळोखे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

या बाबतची अधिक माहिती अशी, सध्या कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश जारी आहे हे माहीत असताना शासनाच्या कोरोना विषाणू संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी जारी केलेल्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करत धोकादायक आजाराचा संसर्ग पसरण्याची शक्यता असताना कोरोना दक्षता समिती यांना कोणतीच पूर्व कल्पना न देता राजकोट गुजरात येथून नाशिक-कोल्हापूर मार्गे शुभम पेडणेकर, संतोष नाईक, समृद्धी पोतदार हे तिघे चारचाकी (एम एच ३०, ए टी ०८३३) मधून नेसरी गावी येत घरी राहिले आहेत. सदरची माहिती कुटुंब प्रमुख सुनिल पेडणेकर यांनी जाणून बुजून लपवली आहे. त्यांच्या कृत्यामुळे घातक आजाराचे संक्रमण होऊ शकते हे माहीत असून सुद्धा गावात प्रवेश करून मानवी जीवित व व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य केले आहे. शिवाय जिल्हाधिकारी यांनी बाहेर जिल्ह्यातून किंवा परराज्यातून कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांचे अलगिकरण करणेबाबत आदेश असताना त्याचे उल्लंघन केल्याबद्दल या चौघांवर नेसरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

कोल्हापुरात कोरोनाचा कहर सुरूच; २२ बळी, ८१७ नवे रुग्ण

Abhijeet Shinde

केंद्राकडे जास्त लस मागणी करणार त्यासाठी फडणवीसांना घेऊन भेटायला जाणार – राजेश टोपे

Abhijeet Shinde

काँग्रेस सत्तेतून बाहेर पडणार

Patil_p

पात्र शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीचा लाभ घ्यावा – सहकारमंत्री

Sumit Tambekar

महाराष्ट्र : ‘या’ जिल्ह्यातही वाढवले पुन्हा एकदा लॉकडाऊन!

Rohan_P

बार्शी आणि वैराग शहर पंधरा दिवस लॉकडाउन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!