तरुण भारत

क्लॉस्ट्रोफोबिया म्हणज काय ?

काही जणांना एखाद्या ठिकाणच्या जमावात किंवा जास्त लोक असतील तिथे जाण्याची भीती वाटते. याला क्लॉस्ट्रोफोबिया असे म्हणतात. हा एक लॅटीन शब्द आहे. याची लक्षणे म्हणजे गर्दीच्या ठिकाणी जाण्यास भीती वाटणे किंवा अशा कल्पनेनेही घाबरायला होणे.

ङलोकांच्या संपर्कात आल्यानंतर आपले कसे होईल या काल्पनिक भीतीच्या अवस्थेला क्लॉस्ट्रोफोबिया असे म्हणतात. काही जणांना आपण गर्दीत गेलो तर तेथे आपल्या शरीराला प्राणवायूचा पुरवठा होणार नाही, असे वाटत राहाते. जर प्राणवायूचा पुरवठा झाला नाही तर आपल्याला श्वास घेण्यास त्रास होईल अशी भीती अशा व्यक्तींना वाटते. काही जणांना बंद सभागृहात जाण्यास भीती वाटते.

क्लॉस्ट्रोफोबियाच्या रूग्णांमध्ये खालील लक्षणे जाणवतात.

  • छातीत तीव्र स्वरूपाच्या वेदना होणे.
  • घशाला कोरड पडणे, अस्वस्थ वाटणे.
  • दरदरून घाम सुटणे.
  • चक्कर येणे.
  • श्वाशोच्छवास वेगाने होणे
  • अनेक वेळा श्वास अडकल्याची भावना होणे.
  • शरीर थरथरणे, थंडी वाजून येणे.
  • डोके बधीर होणे, भ्रम झाल्यासारखी स्थिती होणे.
  • जोराची लघवी लागणे. मळमळणे.

अशी परिस्थिती उद्भवल्यास घाबरून जाऊ नका. या व्याधीवर मात करता येते हे लक्षात ठेवा.

याकरिता कॉग्नेटीव्ह बिहेविअरल थेरपी नावाचा उपचार केला जातो. ही उपचार पद्धती या आजारावर प्रभावी मानली जाते. संबंधित रूग्णाला भीतीच्या भावनेतून हळूहळू बाहेर काढले जाते.

अशा परिस्थितीशी न घाबरता कसा सामना करायचा हे या उपचार पद्धतीतून शिकवले जाते. या उपचार पद्धतीत दीर्घ श्वास घेणे, तसेच मेडिटेशनच्या अन्य मार्गाचा समावेश आहे. मनातील भीतीच्या भावना दूर करण्याकरिता काही औषधेही दिली जातात. मात्र औषधे देणे हा या व्याधीवरचा शेवटचा उपया समजला जातो. ही मानसिक व्याधी आहे, त्यामुळे या व्याधीवर तशाच पद्धतीने उपचार केले जातात. मानसोपचारामध्ये भीतीची भावना मनातून संपूर्णपणे काढता येऊ शकते.

Related Stories

आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्यांनी पुढे येऊन नावे नोंदवावीत

triratna

एकाग्रता

tarunbharat

उत्कटासन

Omkar B

N-95 मास्क कोरोना विषाणूचे संक्रमण रोखू शकत नाही

datta jadhav

व्हेरिकोज व्हेन्स

Omkar B

आम आदमीच्या ‘गोवन्स अगेंस्ट करोना’ मोहिमेंतर्गत ऑक्सिमित्र उपक्रमास मांद्रे मतदार संघांत शुभारंभ

GAURESH SATTARKAR
error: Content is protected !!