तरुण भारत

बार्शीत शालेय पोषण आहारातील ११० टन तांदूळ झाला वाटप

प्रशासनाधिकारी अनिल बनसोडे यांचे चोख नियोजन

बार्शी/प्रतिनिधी :

Advertisements

कोरूना या विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी महाराष्ट्रात संचारबंदी लागू आणि राज्यातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या. शाळा बंद झाल्याने विद्यार्थी शाळेत येत नव्हते मात्र त्यांना रोज शालेय पोषण आहारातून दिला जाणारा आहार हा शाळेत शिल्लक राहिला त्यात प्रामुख्याने तांदुळाचा मोठा साठा प्रत्येक शाळेत शिल्लक होता. याबाबत शासनाने हा तांदूळ आपल्या शाळेतील मुलांना समप्रमाणात वाटावा असा आदेश निर्गमित केला होता. त्याप्रमाणे बार्शी शहर आणि तालुका त्यातील खाजगी आणि सरकारी प्राथमिक शाळा तिल तांदूळ वाटप करण्यात आला. बार्शी शहरातील नगरपालिका शाळा, खाजगी प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा अशा शालेय पोषण आहार योजनेतील 58 शाळांतील 13351 विद्यार्थ्यांना शासन आदेशानुसार 14 मार्च 2020 नंतर शिल्लक असलेला सर्व तांदूळ (110 टन ) वितरीत करण्यात आला. अशी माहिती बार्शी नगरपरिषद प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे यांनी दिली.

यावेळी बनसोडे यांनी सांगितले की , शासनाच्या आदेशानुसार लाॅकडाऊन काळातील सर्व सूचनांचे पालन करून तांदूळ वाटपाचे नियोजन करण्यात आले. वाटपाबाबत योग्य अशा सूचना न प शिक्षण मंडळाचे पदाधिकारी आणि सर्व शिक्षक यांना देण्यात आल्या. यात सर्व शाळांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने नियोजन करण्याबाबत सूचना देऊन एका तासात शाळेच्या आवारात कमीत कमी पालक येतील याकडे लक्ष देऊन पालकांची एकाच वेळी गर्दी होणार नाही याकडे लक्ष देण्याची सूचना करण्यात आली. आजपर्यंत जवळपास 60 टक्के तांदळाचे वितरण करण्यात आले आहे.

या वितरित करण्यात आलेल्या तांदळात इ 1 ली ते 5 वी चे लाभार्थी विद्यार्थी संख्या 7956 यांना
शिल्लक तांदूळ 54729 कि ग्रॅ, इ 6 वी ते 8 वी चे लाभार्थी विद्यार्थी संख्या 5365 यांना शिल्लक तांदूळ 54856 कि ग्रॅ इतका व या प्रमाणत देण्यात आला. यात एकूण इ 1ली ते 8 वी चे लाभार्थी विद्यार्थी संख्या 13321, शिल्लक तांदूळ 109585 कि ग्रॅ ( 109.6 टन ), वितरित करण्यात आला. या तांदूळ वितरणावेळी न प शिक्षण मंडळ, बार्शीचे प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे व पर्यवेक्षक संजय पाटील यांनी विविध शाळांना भेटी दिल्या. वितरण व्यवस्थित होत असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले.

प्रशासनाधिकारी बनसोडे यांचे चोख नियोजन-
शालेय पोषण आहारातील शिल्लक तांदूळ सर्व विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटून देण्याच्या आदेश आल्यानंतर बार्शी प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे यांनी तात्काळ बैठक घेऊन तांदूळ आणि विद्यार्थ्यांची ही आकडेवारी मागून सर्व विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटप करून दिला . हे वाटप होत असताना कोणत्याही प्रकारची गर्दी होऊ नये यासाठी प्रत्येक शाळेत सकाळी चार तासात 20 ते 25 पालक बोलावले गेले त्यामुळे कोणतीही गर्दी किंवा गडबड न होता हे तांदूळ वाटप झाले. प्रशासन अधिकारी बनसोडे हे कार्यक्षम अधिकारी असून त्यांच्या कार्यकाळात नगर परिषद शाळांची पटसंख्या वाढली होती तर तीन शाळांना आय एस ओ प्रमाणपत्रही प्राप्त झाले होते.

Related Stories

उत्रे गावात तीन दिवस कडकडीत बंद

Abhijeet Shinde

१९ कोटींची फसवणूक करणाऱ्या बिल्डरचा जामीन फेटाळला

Abhijeet Shinde

सोलापूर : रेशनकार्डाला आधार, मोबाईल लिंकिंग 31 जानेवारीपर्यंत करून घ्या : जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

लाडक्या बाप्पांना दिला निरोप

Patil_p

डोक्यात फरशी घालून मुलाचा खुन

Abhijeet Shinde

सातारा : मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा,सहा जण ताब्यात

Abhijeet Shinde
error: Content is protected !!