तरुण भारत

देशात कोरोना बाधितांची संख्या 78 हजार पार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

देशात मागील 24 तासात 3 हजार 722 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 134 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 78 हजार 03 वर पोहचली आहे. 

Advertisements


देशात आतापर्यंत 26 हजार 235 कोरोना रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. तर 49 हजार 216 रूग्णांवर उपचार सुरू असून, एकूण मृतांचा आकडा 2549 झाला आहे. 


देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून  कोरोना रुग्णांची संख्या 26 हजार च्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर गुजरात असून तेथील आकडा 9 हजार 267 आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू असून तेथील कोरोना रुग्णांची संख्या 9 हजार 227 आहे. 

Related Stories

6 हजार कोटींचे भांडवल केंद्र सरकार गुंतवणार

Omkar B

जम्मू – काश्मीर : राजौरीमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध झालेल्या चकमकीत एक जवान शहीद

Rohan_P

आणखीन 3 राफेल विमाने भारतात दाखल

Amit Kulkarni

शंकरसिंग वाघेलांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

Patil_p

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

Abhijeet Shinde

जेष्ठ संगीतकार राम लक्ष्मण उर्फ विजय पाटील यांचं निधन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!