तरुण भारत

दापोलीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाल्याने प्रशासनाची धावपळ

तब्बल बारा तासांनी जंगलातून काढले शोधून

दापोली/प्रतिनिधी

Advertisements

दापोली तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने दापोली प्रशासनाची पुन्हा एकदा धावपळ सुरू झाली आहे. त्यात बुधवारी रात्री कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एक रुग्ण लघुशंकेच्या बहाण्याने जंगलात पळून गेल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. त्याला गुरुवारी दुपारी जंगलातून शोधून काढण्यात पोलिसांना यश आले.

दापोली तालुक्यात विविध मार्गांनी आलेल्या चाकरमान्यांना पैकी तालुक्यातील बोरिवली वरचीवाडी येथिल 2, सडवे सुतारवाडी येथील 1 व साकुर्डे गणेशनगर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यातील बोरीवली गावातील एक तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्याला दापोलीत आणण्यासाठी दापोली येथून मध्यरात्री रुग्णवाहिका व प्रशासनाचा एक पथक त्याच्या गावी जाऊन दाखल झालं. त्याला होम कोरोन्टाईन केलेले असल्याने ग्रामस्थांनी त्याची राहण्याची व्यवस्था गावातील शाळेच्या एका खोलीत केली होती. गावात हे पथक पोहोचल्यावर पथकाने लांबूनच त्याला सर्व परिस्थिती समजावून सांगितली. शिवाय त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला असून त्याने रुग्णवाहिकेत बसून दापोलीला त्यांच्याबरोबर यावे अशी विनंती देखील केली. दापोलीतून आलेल्या पथकाला पाहून घाबरलेल्या या तरुणाने लघुशंकेच्या बहाण्याने शाळेच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत जंगलाच्या दिशेने पळ काढला.

सदर युवक कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्याला धावत जाऊन कसे पकडावे असा प्रश्न उपस्थित सर्वांना पडला. यानंतर ही घटना पोलिसांना कळविण्यात आली. दाभोळ पोलिसांना सदर घटना कळतात उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण पाटील, दाभोळ दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल पवार तसेच पोलीस उपनिरीक्षक दीपक कदम यांच्यासह पोलीस मित्र व ग्राम सुरक्षा दलाने रातोरात त्या युवकाला जंगलात शोधण्याची मोहीम हाती घेतली. मात्र रात्रीच्या अंधारात तो कुठेही सापडून आला नाही. सकाळी उजाडताच पुन्हा ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली. तो पळालेल्या जंगलाला चारही बाजूंनी ग्रामस्थांनी वेढा दिला. यानंतर हा युवक जंगलात एका ठिकाणी लपून बसला असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी व ग्रामस्थांनी या युवकाचे लांबूनच प्रबोधन केले. शिवाय पोलीस आलेले आहेत म्हणजे तुला पोलीस कोठडीत टाकणार नाही, तर तुला बरे करण्यासाठी हे पथक आलेले आहे, तू त्यांच्याबरोबर रुग्णवाहिकेत बसून दापोलीत जावे अशी विनंती या युवकाला पोलिसांकडून करण्यात आली. यानंतर सदर युवक सर्वांना शरणाला व रुग्णवाहिकेतून दापोलीकडे रवाना झाला. त्याला दापोलीत आणल्यानंतर अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.

Related Stories

ग्रामविकास अधिकारी धनंजय चौकेकर यांचे निधन

NIKHIL_N

रत्नागिरी : कोकण मार्गावर २१ पासून कोचुवेली – श्री गंगानगर धावणार

Abhijeet Shinde

दोडामार्ग बाजारपेठेत सत्यनारायण पुजांना उत्साहात प्रारंभ

NIKHIL_N

चिपळुणात आशा सेविकेला कोरोना!

Patil_p

सावंतवाडीत 75 आरोग्य कर्मचाऱयांना कोरोना लस

NIKHIL_N

वेंगुर्ले शहरातील गरीब नागरीकांना नगरसेवक संदेश निकम यांचेकडून गणेश चतुर्थी सणांसाठी लागणारे साहित्य वाटप

NIKHIL_N
error: Content is protected !!