तरुण भारत

कृष्णहृदयीं मुष्टिघात

भगवान श्रीकृष्ण आपले स्वामी आहेत हे न जाणल्याने जांबवंत त्यांना एक सामान्य मनुष्य समजून क्रोधायमान होऊन युद्ध करू लागला. त्याच्या आस्वल युद्धाची परिभाषा जाणून श्रीकृष्णही त्याच्याबरोबर तेच डावपेच खेळू लागले. दोघांचे निकराचे द्वंद्वयुद्ध सुरू झाले. कोणीच कुणाला हार जाईना. महापराक्रमी अशा त्या वीरांच्या तुमुल द्वंद्वयुद्धाचे वर्णन कोण करू शकेल? एखाद्या आमिशावर दोन ससाणे एकदम झडपावेत तसे एकमेकाचे प्राण घेण्यासाठी हे तुटून पडले. दारूण युद्ध सुरू झाले.

जैसें विस्तीर्ण पाताळ । तैसें जाम्बवताचें बिळ ।

Advertisements

वृक्ष वल्ली जळ पुष्कळ । अतिसोज्वळ श्रीमंत ।

ऐसिये स्थळीं प्रचंड बळी । दोघे युद्ध करिती सळीं ।

निघे उपटती पाताळीं । वर्षाकाळीं घन जैसे ।

जाम्बवतें अकस्मात । कृष्णहृदयीं मुष्टिघात ।

वोपूनि पाडिला व्यस्तखस्त । मूर्च्छागत करूनियां ।

जैसा द्यूतकाराचा भाव। प्रथम आपण हारवी डाव।

तैसा मूर्च्छित पडला देव । आस्वला हांव दुणावली।

हांवे चढोन जाम्बवत । पुन्हा ओपितां मुष्टिघात ।

कृष्ण लागव्हें धरूनि हात । आंसडूनियां पाडिला ।

झोंकासरसा तोंडघसी । सवेग आदळला पृथ्वीसी ।

जानू ललाट घ्राणमुखासी । रक्तप्रवाह लागले ।

तेणें थरारिला ऋक्ष । म्हणे हा बलि÷ योद्धा दक्ष ।

उठोनि घेतला प्रचंड वृक्ष । तेणें कंजाक्ष ताडिला ।

वृक्षप्रहार पडतां शिरिं । कृष्णें धरिला वरचेवरी ।

हिरोनि घेतला बलात्कारिं । आस्वलाशिरिं ताडावया।

तेणें उसळोनि सवेगें । ऋक्षें वांचविलीं निजाङ्गें ।

शतधनुष्यें सरोनि मागें । बळें अभंगें आवेशला ।

उपडुनि घेतला प्रचंड ताल । सक्रोधें जैसा प्रळयकाळ ।

हृदयीं ताडूनियां गोपाळ । केली विशाळ गर्जना ।

कृष्णें चुकवूनि तालघात । वृक्षें ताडिला जाम्बवत ।

मूर्च्छित पाडिला एक मुहूर्त । पुन्हा नधरत क्षोभला ।

मग राहोनि दूरच्या दुरी । वृक्ष टाकिले सहस्रवरी ।

कृष्णें वारिले वरिच्या वरी । घाव शरीरिं नादळतां ।

वृक्षें वृक्षां वारी हरी । देखोनि ऋक्ष कोपला भारी ।

राम स्मरोनि अभ्यंतरिं । मग पाथरी अभिवर्षे ।

पाताळ जसे विस्तीर्ण आहे तसे जांबवंताचे विवर विस्तीर्ण होते. त्याच्यामध्ये अनेक वृक्ष वल्ली जल हे विपुल प्रमाणात होते. अशा या विवरात ते दोघे बलवान वीर झुंजत होते. जणू वर्षाकाळात दोन घन एकमेकावर आपटावेत असे ते भासत होते. जांबवंताने अचानक श्रीकृष्णाच्या हृदयावर जोरदार मुष्टीप्रहार केला व त्याला खाली पाडले. जसे द्युतात, जुगारात खेळ खेळवणारा पहिल्यांदा हरून घेतो. जेणेकरून तुम्हाला जिंकल्याचा आनंद होऊन तुम्ही पुन्हा जुगार खेळायला उद्युक्त होता. अगदी तसेच जांबवंताचा मुष्टीप्रहार होताच श्रीकृष्णाने मूर्च्छित पडल्याचे नाटक केले. ते पाहून त्या महाकाय अस्वलाला हाव सुटली. त्याने पुन्हा श्रीकृष्णाच्या हृदयावर मुष्टीप्रहार केला, तो त्याचा हात कृष्णाने वरच्यावर पकडला, मुरगाळला आणि जांबवंताला फेकून आपटला. तो झोकाबरोबर तोंडघशी पडला आणि त्याच्या नाकातोंडातून रक्त वाहू लागले.

Related Stories

बीजाक्षर मंत्रे

Patil_p

माझा मित्र

Omkar B

आता तूच आहेस तुझ्या आरोग्याचा रक्षक!

Patil_p

साधुलक्षणे-षड्रिपुंवर विजय, अमानिता आणि सर्वांप्रति आदरभाव

Patil_p

भय इथले संपत नाही….

Patil_p

त्याच खड्डय़ात झाडे!

Patil_p
error: Content is protected !!