तरुण भारत

निस्सान बीएस- 6 दास्तुन गो बाजारात

वृत्तसंस्था / नवी दिल्ली :

निस्सार मोटर इंडियाने बीएस 6 वर आधारीत आपली दास्तुन गो आणि गो प्लस या कार्स भारतीय बाजारात सादर केली आहे. दास्तु गो ही पाच जण बसतील अशी कार 3.99 लाखाच्या पुढे उपलब्ध असणार आहे. यातलीच सीव्हीटी ट्रीम प्रकारातील कार ही 6.25 लाख रुपयांना उपलब्ध होणार आहे.

Advertisements

याखेरीज सात जण बसतील अशी त्यांची दास्तुन गो प्लस या कारची किंमत 4.2 लाख असणार आहे तर सीव्हीटी ट्रीम प्रकारातील कारची किंमत 6.7 लाख इतकी असणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. चांगल्या दर्जात्मक सुधारणांसह कंपनीने आपली वाहने सादर केली असून भविष्याचा विचार करून तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी कंपनीने परिश्रम घेतले असल्याचे निस्सान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राकेश श्रीवास्तव यांनी सांगितले. जपानी तंत्रज्ञानाने बनवण्यात आलेली वाहने सीव्हीटी या अत्यंत सुसहय़ पर्यायासह असतील. या कार्सच्या विक्रीकरता कंपनी कल्पक वित्त योजनाही ग्राहकांकरीता राबवणार आहे.

Related Stories

मुकेश अंबानी जगातील श्रीमंतात 6 व्या स्थानी

Patil_p

ऊर्जा वापरात ऑक्टोबरमध्ये झाली वाढ

Patil_p

2020-21 मध्ये जीडीपी 5.1 टक्क्यांवर : फिच

tarunbharat

अंतिम सत्रात सेन्सेक्स 60,000 पार

Patil_p

टाटा मोर्ट्सने फ्री सर्व्हिसचा कालावधी वाढवला

Patil_p

कॉग्निझंट करणार 23 हजार जणांची भरती

Omkar B
error: Content is protected !!