25 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

दिल्ली : एका दिवसात सर्वाधिक 472 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8 हजार 470

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  :

दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. गेल्या चोवीस तासांत 472  कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर मागील चार दिवसात दीड हजार पेक्षा कोरोना रुग्ण वाढले असून 115 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर दिल्लीत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 8  हजार 470 वर पोहोचली आहे, अशी माहिती दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली. 

ते म्हणाले, दिवसेंदिवस दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आणि कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या संख्येत वाढ होत आहे. मागील चोवीस तासात 472 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले. तर 187 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 


पुढे ते म्हणाले, विभागानुसार, एकूण 8470 पैकी 3045 रुग्णांना आता पर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 5 हजार 313 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोविड रुग्णालयात 1697 रुग्ण दाखल असून यातील 145 जण आयसीयूमध्ये तर 21 जण व्हेंटिलेटरवर आहेत. त्याच बरोबर कोविड हेल्थ केअर सेंटर मध्ये 117 आणि कोविड केअर सेंटरमध्ये 833 आणि होम आयसोलेशनमध्ये 1123 रुग्ण आहेत.

दिल्लीत आता पर्यंत 1 लाख 19 हजार 736 जणांची चाचणी करण्यात आली आहे. तर हॉटस्पॉट ची संख्या 78 वर पोहचली आहे. असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related Stories

पंजाबमध्ये 845 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; 26 जणांचा मृत्यू

pradnya p

आर-पार लढाईसाठी सैन्य सज्ज!

Patil_p

ओवैसी अन् केसीआर यांच्याकडून घुसखोरांची होतेय पाठराखण

Omkar B

महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांची जयंती घरीच साजरी करा : प्रकाश आंबेडकर

prashant_c

भारत जगासाठी औषधी केंद्र : पंतप्रधान मोदी

datta jadhav

महाराष्ट्राला ‘महा’झटका

Amit Kulkarni
error: Content is protected !!