तरुण भारत

यंदा मान्सूनचे आगमन चार दिवस उशिरा, केरळात 5 जूनला दाखल होणार

ऑनलाईन टीम / मुंबई :

दरवर्षी केरळमध्ये एक जूनला दाखल होणार मान्सून यंदा चार दिवस उशिराने म्हणजेच 5 जूनला दाखल होणार आहे अशी माहिती शुक्रवारी हवामान विभागाकडून देण्यात आली.  

Advertisements


देशात मान्सूनचा हंगाम 1 जून ला सुरू होतो. आपल्या देशात केरळमध्ये पहिल्यांदा पाऊस दाखल होतो. मात्र, यंदा केरळमध्ये मान्सूनची सुरुवात नेहमीच्या तारखेपेक्षा थोडी उशिरा म्हणजेच चार दिवस विलंबाने सुरू होणार आहे.


केरळ नंतर तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, बिहार, उत्तरप्रदेशमध्ये देखील मानसून दाखल होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.


महाराष्ट्राच्या तळकोकणात दरवर्षी साधारण दहा जूनला मान्सून दाखल होतो. पण केरळमध्येच यंदा  चार दिवस उशिराने दाखल होणार असल्याने राज्यात देखील विलंबाने म्हणजेच साधारण 11 जून च्या आसपास दाखल होईल.

 
तसेच परतीच्या पावसातही बदल होण्याची शक्यता आहे त्यानुसार, 15 ऑक्टोबरला मान्सून माघार घेईल, असे ही हवामान विभागाकडून सांगण्यात आले. 

Related Stories

हैदराबादमध्ये DRDO ने सुरू केली मोबाईल टेस्टिंग लॅब

prashant_c

कृषी कायद्यात ‘दोष’ नाहीतच!

Patil_p

प्रियंका गांधी ललितपूर दौऱ्यावर; मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

Abhijeet Shinde

८४ टक्के शालेय शिक्षकांनी घेतला लसीचा एक डोस: शिक्षण विभाग

Abhijeet Shinde

आसाममध्ये भाजपला धक्का; BPF ने सोडली साथ

datta jadhav

मान्सून आला रे….

datta jadhav
error: Content is protected !!