तरुण भारत

देवगडात आणखी एका खलाशाचा मृत्यू

देवगडमध्ये मृत खलाशांची संख्या चारवर : अजूनही आजाराचे निदान नाही

प्रतिनिधी / देवगड:

Advertisements

देवगड बंदरातील बोटींवर आणखी एका खलाशाचा अज्ञात रोगाने ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. आतापर्यंत चार खलाशांचा या अज्ञात आजाराने मृत्यू झाला असून या आजाराचे अद्यापही निदान झालेले नाही. धनंजय कृष्णप्रसाद गौडा (24 रा. नेपाळ, सध्या रा. देवगड) असे मृत खलाशाचे नाव असून मच्छीमार व्यावसायिक बाबू हिरनाईक यांच्या बोटीवर काम तो काम करीत होता.

देवगड बंदरातील सुमारे 16 खलाशांना या अज्ञात रोगाची लागण झाली आहे. यामध्ये खलाशांचे ढोपराच्याखाली पायांना सूज येऊन त्यांना उभं राहता येत नाही. आतापर्यंत देवगडमधील 4 तर मालवणमधील एका खलाशाचा या आजाराने मृत्यू झाला आहे. खलाशांचा एका अज्ञात आजाराने मृत्यू होत असताना आरोग्य विभागाला मात्र या रोगाचे निदान करता आलेले नाही. तसेच आरोग्य विभागाने सर्व्हे व्यतिरिक्त कोणतीही उपयायोजना केली नसल्याचे मच्छीमारांनी सांगितले.

आठ दिवसानंतर दुसऱया खलाशाचा या आजाराने मृत्यू झाला आहे. यापूर्वी 6 मे रोजी पल्लवी कांदळगावकर यांच्या बोटीवरील खलाशाचा मृत्यू झाला होता. तर त्यापूर्वी द्वीजकांत कोयंडे यांच्या बोटीवरील दोन खलाशांचा मृत्यू झाला होता.

Related Stories

ज्येष्ठ गझलकार मधुसुदन नानिवडेकर यांचे निधन

Ganeshprasad Gogate

जिल्हाधिकाऱयांच्या हस्ते पुरस्कार स्विकारल्याने प्रशासकीय सेवेची प्रेरणा

Patil_p

रत्नागिरी (संगमेश्वर) : कर्णेश्वरची महाशिवरात्र यात्रा रद्द

triratna

मासेमारी नौका उलटली, एक बेपत्ता

NIKHIL_N

निवडणूक प्रशिक्षणात सोशल डिस्टंन्सिगचा ‘फज्जा’

Patil_p

पंधरा दिवसानंतरही 60 टक्के दापोली अंधारात!

Patil_p
error: Content is protected !!