तरुण भारत

इंग्लिश फुटबॉल लिग सुरू करण्यास शासनाची परवानगी

वृत्तसंस्था / लंडन

संपूर्ण ब्रिटनमध्ये कोरोना महामारीचे संकट सुरु असताना ब्रिटनच्या शासनाने देशातील महत्त्वाच्या इंग्लिश प्रिमियर लिग फुटबॉल स्पर्धेला जून महिन्यात सुरुवात करण्याकरिता हिरवा कंदील दाखविला आहे.

Advertisements

कोरोना संकटामुळे ब्रिटनमध्ये सर्व क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. क्रिकेट, टेनिस व फुटबॉल हे क्रीडा प्रकार लांबणीवर टाकण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. दरम्यान, ब्रिटनमध्ये फुटबॉल हंगाम लवकर सुरु करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. येत्या जून महिन्यात इंग्लंडमध्ये प्रसिद्ध असलेली इंग्लिश प्रिमियर लिग फुटबॉल स्पर्धा सुरु करण्यास शासनाने होकार दर्शविला आहे. कोरोना महामारीमुळे आतापर्यंत संपूर्ण ब्रिटनमध्ये 33 हजार लोकांचे बळी पडले आहेत. ही स्पर्धा बंदीस्त स्टेडियममध्ये प्रेक्षकाविना खेळविण्यासंदर्भात चर्चा सुरु आहे. लवकरच या समस्येवर तोडगा काढला जाईल. पण कोणत्याही परिस्थितीत जून महिन्यात ब्रिटनमध्ये फुटबॉल हंगामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा केली जात आहे.

Related Stories

चेन्नईचा केकेआरविरुद्ध सनसनाटी विजय

Patil_p

माद्रीद स्पर्धेत ओसाकाची विजयी सलामी

Patil_p

जेनीफर ब्रॅडी पराभूत

Patil_p

पाक संघाचे इंग्लंडला प्रयाण

Patil_p

ब्रिटनचा कॅमेरून नोरी विजेता

Patil_p

सुदिरमन चषक स्पर्धेतून चिराग-सात्विकची माघार

Patil_p
error: Content is protected !!