तरुण भारत

चाकरमान्यांना घेऊन टॅव्हल्स, मिनी बसेसची अवैध ‘एन्ट्री’!

गुहागर तहसीलदारांना उलगडेना कोडे,

प्रतिनिधी/ गुहागर

Advertisements

गुहागर तालुक्यात शुक्रवारी मोठय़ाप्रमाणात मुंबईतील चाकरमान्यांनी हजेरी लावली. हे चाकरमानी सर्वाधिक खासगी टॅव्हल्स व मिनीबसेसने आले. जर सरकारने प्रवासी वाहतुकीसाठी ट्रव्हल्सना परवानगीच दिली नाही तर मुंबईतून चाकरमान्यांना घेऊन या सर्व ट्रव्हल्स अवैधपणे गुहागरमध्ये कशा काय येत आहेत? अशा ट्रव्हल्सना मुंबईतून कसे सोडले जाते? याचे कोडे सध्या तहसीलदारांना पडले आहे.

शासनाने बोहरून येणाऱया व बाहेर जाणाऱयांसाठी ई-पास व ऑनलाईन वेबसाईटची सेवा दिली आहे. गुहागर तालुक्यातून जाणाऱयांची नावे जिल्हाधिकांऱयामार्फत तहसील प्रशासनाकडे पाठवली जातात. त्याप्रमाणे तहसीलदारातर्फे इच्छुक लोकांना घरी पाठवण्यासाठी एस. टी. सेवेची व्यवस्था केली जाते. या प्रत्येक एस. टी. बसमध्ये 21 प्रवासीच घेतले जातात. आतापर्यंत 121 जणांना लातूर व झारखंडला रवाना करण्यात आले आहे, परंतु गुहागर तालुक्यात येणाऱयांबाबत प्रशासनाकडे कोणतीच पूर्वकल्पना मिळत नसल्याचे तहसीलदार धोत्रे यांनी सांगितले.

गुहागर ग्रामीण रूग्णालयामध्ये मोठय़ाप्रमाणात गर्दी होऊ लागल्यावर मार्गताम्हाने-बोऱया फाटा येथे चेकपोस्ट उभारून याची पडताळणी सुरू करण्यात आली. खरे तर मुंबईहून येणाऱयांची पूर्वकल्पना मिळणे आवश्यक आहे, परंतु मुंबई-पुण्याबाबत नक्की काय चालले आहे हे मलाही सांगता येत नाही. आम्ही येणाऱयांना कन्टेन्मेंट झोनमधील असेल तर विलगीकरण कक्षात ठेवत आहोत. नॉन कन्टेन्मेंट झोनमधील व्यक्तीच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारून त्यांच्या घरी म्हणजे प्रत्येक गावातील ग्राम कृतीदलाकडे पाठवत आहोत. यामुळे सध्यातरी प्रत्येक गावातील ग्राम कृतीदल चांगल्या पद्धतीने काम करत आहे, असेही धोत्रे म्हणाल्या.

ट्रव्हल्समधून प्रवासी वाहतूक कशी

सरकारच्या आदेशाप्रमाणे माल वाहतूक वाहनांना परवाना देण्यात आला आहे. राज्यात अद्यापही प्रवासी वाहतुकीसाठी ट्रव्हल्स व मिनीबसकरिता कोणतीही परवानगी नाही. यामुळे मुंबईतून येणाऱया या ट्रव्हल्स विनापरवाना येत आहेत. काहीजण तर चेकनाका चुकवण्यासाठी आडमार्गाने तालुक्यात शिरकाव करत आहेत. मात्र गावाने नाकारले की तहसीलमध्ये पुढील कार्यवाहीकरिता विचारणा करण्यासाठी येत आहेत. यामुळे एकप्रकारे गोंधळाचे वातावरण सुरू असून याबाबतची माहिती जिल्हा पातळीवर पाठवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

ट्रव्हल्समध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

प्रशासनाकडून बाहेर पाठवणाऱयांसाठी एस. टी. बसमधून प्रत्येक शिटवर 1 याप्रमाणे केवळ 21 जणांचीच वाहतूक होत आहे, परंतु ट्रव्हल्समधून येणाऱयांची संख्या 30 ते 35 जणांची आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसून येत आहे. मुंबईपासून ठिकठिकाणी चेकनाके आहेत. मग याठिकाणी प्रथम याचा विचार का केला जात नाही, हा प्रश्नच आहे.

प्रशासनाच्या धोरणामध्ये सर्व काही अलबेल

एकाबाजुला महसूल प्रशासनाकडे कोवीड 19बाबत खबरदारीची सर्व यंत्रणा देण्यात आली आहे, परंतु खासगी ट्रव्हल्समधून सोशल डिस्टन्सिंग न पाळता येत असलेल्या चाकरमान्यांमुळे त्यांना पुढील मार्गावर जाण्याची परवानगीच कशी मिळते? यामुळे काहीजणांनी सर्वकाही अलबेल असल्याचे पहावयास मिळत आहे.

Related Stories

दापोलीत पर्यटनक्षेत्र पुन्हा शांत होण्याची शक्यता

Abhijeet Shinde

अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर

NIKHIL_N

कोरोनामुळे मराठी रंगभूमी ‘दीन’

NIKHIL_N

पावसाळी डांबर असताना खड्डे मुरुमाने का बुजवता?

NIKHIL_N

रत्नागिरी : साताऱ्यातील तरूणाचा महामार्गावर आत्महत्येचा प्रयत्न

Abhijeet Shinde

हिरवे डोंगर राखण्याची लढाई

NIKHIL_N
error: Content is protected !!