तरुण भारत

पोलीस बंदोबस्तात ‘वाईन शॉप’ खुली

घशाला कोरड पडलेल्या तळीरामांना दिलासा

प्रतिनिधी/ रत्नागिरी

Advertisements

शहरातील मद्याची दुकाने होण्यासाठी चातकासारखी वाट पाहत असलेल्या तळीरामांची प्रएडक्षा अखेर शुक्रवारी संपल़ी जिल्हाधिकारी यांचे आदेश प्राप्त होताच सकाळी 10 वाजता पोलीस बंदोबस्तात वाईन शॉप खुली करण्यात आल़ी  गेला दिड महिना दारू नसल्याने बेचैन झालेल्या तळीरामांना प्रशासनाच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आह़े

  मद्याची दुकाने सुरू होणार असल्याची माहिती सर्वत्र पसरल्यानंतर शुक्रवारी सकाळपासूनच विविध वाईन शॉपसमोर गर्दी दिसून आल़ी सोशल डिस्टंसिगचे पालन करण्यासाठी दुकानाबाहेर उभे राहण्यासाठी आखणी करण्यात आली होत़ी तसेच येणाऱया प्रत्येक ग्राहकाला सॅनिटायझरचा वापर व मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले होत़े  त्यामुळे शिस्तबद्ध पद्धतीने शहरातील मद्यविक्री होत असल्याचे दिसून आल़े

 मद्यविक्रीमधून मिळणारे उत्पन्न लक्षात घेवून 4 मे पासून वाईन शॉप खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला होत़ा  त्यासाठी केंद्र शासनाकडून विविध मार्गदर्शन तत्वे देखील जाहीर करण्यात आली होत़ी मात्र मद्य दुकानांसमोर होणाऱया गर्दीमुळे सोशल डिस्टांन्सिगचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत होत़े  या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची वाईन शॉप मालकांकडून व्यक्त करण्यात आली होत़ी रत्नागिरी जिह्यात जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी वाईन शॉप सुरू करण्याचे आदेश दिले असतानाही ही दुकाने खुली करण्यात आली नव्हत़ी  वाईन शॉप सुरू करण्यासाठी संरक्षण मिळावे, अशी भूमिका वाईन शाप व्यावसायिकांनी घेतली होत़ी  त्यानुसार शुक्रवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात वाईन शॉपची दुकाने खुली करण्यात आल़ी

  मद्याच्या दुकानांबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम असल्याने मोठय़ा प्रमाणावर स्टॉक जमा करण्यावर भर देण्यात आल़ा किरकोळ खरेदी न करता बॉक्स विकत घेताना अनेकजण दिसून आल़े त्यामुळे शहरातील दुकानांमधून मोठय़ा प्रमाणावर आर्थिक उलाढाल मद्यविक्रीमधून झाल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

रायपाटण ग्रामीण रूग्णालयाची वीज कापली!

Patil_p

जातीय तेढ निर्माण करणाऱयांवर कारवाई करा

Patil_p

‘प्रधानमंत्री मातृत्व वंदना’ 2201 मातांना ठरली आर्थिक आधार

Patil_p

बापरे; जेलमधील दहाजणांना कोरोना, एक डॉक्टरदेखील पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

कोरोनाचा सामना करण्यात मुख्याधिकारी असमर्थ!

NIKHIL_N

महामार्गावर गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा ट्रक पकडला

Patil_p
error: Content is protected !!