तरुण भारत

जिल्हा बॅकेला 10 लाख रूपयांचा गंडा

बनावट पासवर्डने पैशाचा व्यवहार

प्रतिनिधी/ रत्नागिरी

Advertisements

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शचा बनावट पासवर्ड तयार करून 10 लाख रूपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आह़े आतापर्यंत एटीएमचा नंबर विचारून सर्वसामान्य लोकांची ऑनलाईन फसवणूक होण्याचे प्रकार समोर येत होत़े मात्र आता बँकेलाच ऑनलाईन गंडा घातला गेल्याने खळबळ उडाली आह़े

 पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे आयडीबीआय बँकमध्ये खाते आह़े  ज्यावेळी जिल्हा बँकेचे आयडीबीआय बँकेमध्ये काही आर्थिक व्यवहार करावयाचा असतो, त्यावेळेस एक फाईल पाठवण्यात येत़े 4 मे रोजी अज्ञात इसमाने जिल्हा बँकेचा बनावट युनिक आयडी साईन वापरून 10 लाख रूपये जिल्हा बँकेच्या खात्यामधून काढून घेतल़े आर्थिक व्यवहार करण्यासाठी कोणतेही फाईल पाठवली नसताना 10 लाख रूपयांचा व्यवहार झाल्याने बँक व्यवस्थापनाचे धाबे दणाणल़े

 या घटनेचे गांर्भीय ओळखून जिल्हा बँकेचे उपव्यवस्थापक योगेश गजानन मोरे यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आह़े  रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक ही कोकणातील शेतकऱयांची बँक समजली जात़े  सर्वसामान्य लोकांची गुंतवणूक या बँकेत आह़े  अशा परिस्थितीत बँकेची होणारी फसवणूक चिंतेचा विषय बनली आह़े 4 मे रोजीचा प्रकार समोर आल्यानंतर बँकेकडून या घटनेची अंतर्गत चौकशी करण्यात आली होत़ी मात्र हा व्यवहार करण्यामागे नेमके कुणाचा हात आहे, हे समजून न आल्याने शेवटी तक्रार दाखल करण्याचा निर्णय व्यवस्थापनाकडून घेण्यात आल़ा जिल्हा मध्यवर्ती बँक सातत्याने वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिली आह़े  पारदर्शी व्यवहारासाठी अनेक पुरस्कार या बँकेला मिळाले आहेत़ मात्र अशा प्रकारे बँकेचा बनावट पासवर्ड तयार करून 10 लाख रूपयांची फसवणूक झाल्याने बँकेच्या व्यवस्थापनासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आह़े या प्रकारामागे कुणी बँकेच्या आतीलच व्यक्ती असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आह़े  मात्र पोलिसांच्या तपासानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आह़े

Related Stories

आंबा व्यवसायातून दोन लाख नेपाळींना रोजगार

NIKHIL_N

एलईडी नौकेवर खलाशाचा शॉक लागून मृत्यू?

Patil_p

राज्यपालांचा मी लाडका मंत्री; मला कुठलीच अडचण येत नाही

triratna

अखेर लालपरीने ओलांडली जिल्ह्याची सीमा

triratna

हापूस निर्यातीसाठी ‘मँगोनेट’ला वाढती पसंती

Amit Kulkarni

138 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत

NIKHIL_N
error: Content is protected !!