तरुण भारत

अवकाळी पावसाने रस्त्यावर मातीचे लोट

वार्ताहर/ परळी

गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळा वाढू लागल्या होत्या. एकीकडे कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे घरात उकाडा अशा वातावरणात दोन वेळा हुलकावणी दिलेल्या अवकाळी पावसाने सातारा शहरासह परळी खोऱयात धुवाँधार बरसात करत दोन ते तीन तास चांगलेच झोडपून काढले धुवाँधार पाऊस अन् नालेसफाई न झाल्याने डोंगरावरील मातीचे लोट हे रस्त्यावर आल्याने ठिकाणी वाहनधारकांना प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. 

Advertisements

  परळी ते केळवली या मार्गाची दुरुस्ती गेली कित्येक वर्षे झालेली नाही. तसेच रस्त्या नजीकच्या नाल्याची खुदाई न केल्याने गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसाने डोंगरावरील मातीचे लोट रस्त्यावर आले यामुळे वाहनधारकांची त्रेधातिरपीट उडत आहे तरी संबंधित प्रशासनाने रस्तेदुरुस्ती केली तर नाहीच पण नाली खुदाई तरी करा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहे.  

मातीचे लोट देताहेत अपघातांना आमंत्रण

परळी ते केळवली या मार्गावरील नालेसफाई न झाल्याने गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसाने डोंगरावरील मातीचे लोट हे रस्त्यावर आल्याने वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज घेता येत नाही. यामुळे छोटे-मोठे अपघातांना एकप्रकारे आमंत्रण मिळत आहे. 

Related Stories

संगमेश्वर : माय-लेकरांची पंधरा वर्षांनंतर भेट !

Shankar_P

साताऱ्यात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ गाजर वाटप

datta jadhav

एमआयडीसीत भंगार चोरटय़ांचा हैदोस

Patil_p

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही : जयंत पाटील

Shankar_P

वाळू चोरीचा गुन्हा चालकांवर, मालक मात्र मोकाटच

triratna

सातारा यवतेश्वर कास रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य

Shankar_P
error: Content is protected !!