तरुण भारत

ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा, प्रशिक्षणाने खेळाडू व्यस्तः संजय कवळेकर

क्रीडा प्रतिनिधी / मडगाव

ऑनलाईन स्पर्धा आणि प्रशिक्षणामुळे राज्यातील बुद्धिबळ खेळाडू कोविड 19 महामारीच्या लॉकडाऊन काळातही सतत व्यस्त आहेत, असे गोवा क्रीडा प्राधिकरणाचे सीनियर बुद्धिबळ प्रशिक्षक संजय कवळेकर म्हणाले.

Advertisements

लॉकडाऊनच्या काळात गोव्याच्या बुद्धिबळपटूंची राष्टीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कित्येक स्पर्धा खेळण्याची आणि आपलं फिडे मानांकन वधारण्याची संधी जरी हुकली तरी या खेळात ऑनलाईन माध्यमाद्वारे खेळाच्या आणि प्रशिक्षकांच्या संपर्कात राहाणे खेळाडूंना जमले आहे.

गोव्यात होणारी गोवा बुद्धिबळ संघटनेची मनोहर पर्रीकर 2020 आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा आणि युनिक चेस अकादमीची दुसरी अखिल भारतीय फिडे मानांकन बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली. या दोन्ही स्पर्धा रद्द झाल्याने गोव्याच्या बुद्धिबळपटूंचे मोठं नुकसान झाल्याचे कवळेकर म्हणाले. या दोन्ही स्पर्धा झाल्या असत्या तर आमच्या खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील बुद्धिबपटूंशी खेळता आले असतं.

मात्र आम्ही आमच्या खेळाडूंशी ऑनलाईन स्पर्धा आणि प्रशिक्षणांमुळे सतत संपर्कात आहोतच. या खेळात नियमित सराव आवश्यक आहे. मी माझ्या खेळाडूंना ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सांगतो, यात खेळाडूंच्या पालकांचाही पाठिंबा मोलाचा असतो असे कवळेकर म्हणाले.

माझ्या फातोर्डा आणि कुडचडे आरसीसी प्रशिक्षण केंद्रात आम्ही या लॉकडाऊनच्या कार्यकाळात विविध स्पर्धा ऑनलाईन माध्यमाद्वारे आयोजित करून माझ्या प्रशिक्षणार्थ्यांना नियमित व्यस्त ठेवले आहे. आरसीसी बुद्धिबळपटूंसाठी प्रत्येक आठवडय़ात आम्ही स्पर्धा आयोजित केल्या. दोन्ही केंद्रांत आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. आता तर माझे खेळाडू देशातील विविध भागात होणाऱया ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेतही भाग घेत असल्याचे यावेळी कवळेकर म्हणाले. तिसवाडीतील क्विन्स चेस अँड कल्चरल क्लबनेही प्रत्येक आठवडय़ात ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करत असून यामुळे खेळाडूंना स्पर्धेपूर्वी चांगला सराव करण्याची संधी उपलब्ध झाल्याचे ते म्हणाले.

Related Stories

गोव्यातील सर्व मुस्लिम बांधवाना भाजपात आणणार

Omkar B

सनबर्नचे आयोजन पूर्णतः कोरोनास्थितीवर अवलंबून

Patil_p

मार्केटिंग फेडरेशनची सर्व भांडारे आजपासून खोलणार

Patil_p

मोपा पीडित शेतकऱयांची 18 रोजी उपजिल्हाधिकारी कार्यलयात बैठक

Omkar B

खनिज ‘डंप’ वाहतुकीस अनुमती

Patil_p

गोव्यातील सर्व पोलीस स्थानकात सीसीटीव्ही आहेत- पोलीस खाते

Amit Kulkarni
error: Content is protected !!