तरुण भारत

‘स्लोवेनिया’ : युरोपातील पहिला कोरोनामुक्त देश

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

 ‘स्लोवेनिया’ हा युरोपातील पहिला कोरोनामुक्त देश आहे. स्लोवेनिया सरकारने याबाबतची घोषणा  केली आहे.

Advertisements

स्लोवेनिया सरकारने दिलेल्या माहितीनुसार,  स्लोवेनियात कोरोना नियंत्रणात आला आहे. मागील दोन आठवड्यांमध्ये दरदिवशी सातपेक्षा कमी नवीन रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे देशात विशिष्ट आरोग्यासंदर्भातील उपाययोजनांची आवश्यकता नाही. युरोपीय संघाच्या इतर देशांतील लोकांना स्लोवेनियात येण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यांना सात दिवसांसाठी क्वॉरंटाईन करण्यात येणार नाही. परंतु, ज्या व्यक्ती युरोपीय संघातील सदस्य नाहीत, त्यांना 14 दिवसांपर्यंत आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणे असतील त्यांना देशात येण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. 

स्लोवेनियाची लोकसंख्या अंदाजे 20 लाख आहे. स्लोवेनियामध्ये आतापर्यंत 1464 लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. तर 103 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

राहुल गांधींना कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

“आम्ही पळत नव्हतो, इशारा न देताच सर्व बाजूंनी गोळीबार…”; पीडित व्यक्तीने अमित शाहांचा दावा फेटाळला

Abhijeet Shinde

बेनझीरकन्येचा विवाह, कोरोना चाचणी अनिवार्य

Patil_p

कॅनडातील एअर इंडिया आणि AAI ची संपत्ती जप्त

datta jadhav

संयुक्त राष्ट्राच्या गाडीत सेक्स, व्हिडिओ व्हायरल

datta jadhav

रशियन लसीच्या लवकरच भारतात चाचण्या होणार

Patil_p
error: Content is protected !!