तरुण भारत

बार्शीत 347 पोती तंबाखू सील

प्रतिनिधी / बार्शी

कोरोना या विषाणूचा संसर्ग फैलावू नये या कारणासाठी राज्यातील संपूर्ण पान टपरी किंवा तंबाखूजन्य पदार्थ विकणारी केंद्रे आणि दुकाने बंद करण्याचे आदेश या आधीच शासनाने दिले आहेत. त्याप्रमाणे सोलापूर जिल्हाधिकारी यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये गुटका, तंबाखू ,तंबाखूजन्य पदार्थ, मावा, खैनी असे पदार्थ विकणे व त्यांची वाहतूक करणे यास प्रतिबंध केला होता. परंतु बार्शी शहरांमध्ये एका गोदामात गायछाप या तंबाखूचा साठा असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागास समजल्यानंतर त्यांनी याबाबत अधिक माहिती घेऊन हा साठा प्रतिबंधित केला आहे ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक राजेश बडे यांनी केली, याबाबत राजेश बडे यांना संपर्क केला असता त्यांनी ही माहिती दिली.

Advertisements

बार्शी शहरांमध्ये आणि तालुक्यामध्ये गायछाप तंबाखू आणि सुट्टी तंबाखू विक्री होत असल्याचे यापूर्वी अनेक तक्रारी बार्शी पोलीस ठाणे आणि अन्न व औषध प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या यावेळी याबाबत अनेक माध्यमांनी वृत्तप्रसारित केले होते. बार्शी शहरात गायछाप तंबाखू ही चौपट ते पाचपट भावात काळ्याबाजारात विकले जात होते. त्यात हे व्यापारी कोण आहे. हे त्यांनी साठा कोठे लपून ठेवला याबाबत मात्र माहिती मिळत नव्हती मात्र अन्न व औषध प्रशासन यांचे निरीक्षक राजेश बडे यांनी दिनांक 15 रोजी शुक्रवार सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बार्शीतील सुप्रसिद्ध व्यापारी आनंद सुराणा यांच्या गोदामात पाहणी केली असता त्यांना 347 पोती गायछाप तंबाखू आढळून आली. तेव्हा त्यांनी लागलीच ती तंबाखू आणि पोती विक्री होऊ नये यासाठी प्रतिबंधित करून सील केली. बार्शीतील सुराणा यांचे फार्म गौरव ट्रेडिंग कंपनी या नावाने असून प्रदीप चंद सुराणा यांच्या मालकी ने ही फर्म आहे तर हे सील करताना आनंद सुराणा हे उपस्थित होते.

तर याच दिवशी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास बार्शी पोलीस उपनिरीक्षक ननावरे यांना एका पिकप टेम्पो मधून तंबाखू येत असल्याची माहिती मिळाली असता त्यांनी बालाजी कॉलनी जवळ तो टेम्पो अडवून तो टेम्पो बार्शी पोलीस ठाणे येथे आणला असता त्यात मागील बाजूस स्टेशनरी सामान तर पुढील बाजूस 30 ते 35 गायछाप गायछाप तंबाखू नेत असल्याचे आढळले याबाबत अधिक चौकशी केली असता ही तंबाखू सुद्धा या टेम्पो चालकाने सुराणा यांच्याकडून खरेदी झाली असल्याचे सांगितले. याबाबत अन्न व औषध विभाग पुरवठा निरीक्षक राजेश बडे यांना बार्शी पोलीस ठाणे यांनी कळवले असून त्याबाबत ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

सांगली : जनावरांना घातला दुधाचा अभिषेक, आटपाडी तालुक्यात आंदोलन

Shankar_P

कोरोनो पासून बचावासाठी आरोग्य पोलिस व ग्रामपंचायत विभागांचे महत्त्व अनन्यसाधारण

triratna

संगणकीय सेवा-सुविधांच्या कामात शेकडो कोटींचा ढपला

triratna

65 लाख ग्राहकांनी भरले ऑनलाईन वीज बिल

triratna

सोलापूर : २७ डिसेंबरला १२ परीक्षा केंद्रावर होणार सेट परीक्षा

triratna

राज्यात लॉकडाऊन वाढवला पाहिजे -छगन भुजबळ

triratna
error: Content is protected !!