तरुण भारत

मोडनिंब परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

प्रतिनिधी / मोडनिंब

शनिवारी दुपारी चार वाजता मोडनिंब परिसरात वादळी वारा, मेघ गर्जना आणि विजांच्या कडडाटासह जोरदार गारांचा पाऊस झाला.सुरुवातीला सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने गारांच्या पावसाला सुरुवात झाली. या भागात गारांच्या पावसाने आणि वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणच्या घरांचे पत्रे उडून गेले तर रस्त्याच्या कडेची झाडे उन्मळून पडली आणि विजेच्या तारा ही तुटल्या. तुळशी,अरण, सोलंकरवाडी, मोडनिंब, जाधववाडी, बैरागवाडी, या गावांमध्ये काही ठिकाणी झालेल्या पावसाने शेतांमध्ये पाणी साचले होते तर काही ठिकाणी पावसाचे पाणी वाहत होते. सोसाट्याच्या वाऱ्याने मेघगर्जनेसह जोरदार पडलेल्या अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी पोल्ट्री फॉर्म, जनावरांचे गोठे, पत्र्याचे शेड, आणि शेतीचे ही काही प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. पाऊण तास सुरू असलेला पाऊस आणि सोसाट्याचा वारा थांबल्यावर वातावरण गारवा निर्माण झाला होता. तर नागरिक रस्त्यावर येऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करत होते.

Advertisements

Related Stories

सोलापूर : पंढरीत पत्रकारांचे आत्मक्‍लेश आंदोलन

Abhijeet Shinde

सोलापूर शहरात 39 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, 9 जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

कोल्हापूर : पुलाची शिरोलीत महावितरणचा कायमस्वरूपी अधिकारी मिळावा

Abhijeet Shinde

सोलापुरात सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण, आरोपीला १८ तासात अटक

Abhijeet Shinde

तुम्ही उकीरडे फुंकत हिंडलात ; राऊतांची भाजपच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेवर टीका

Abhijeet Shinde

भय इथले संपत नाही….

Patil_p
error: Content is protected !!