तरुण भारत

ब्रिटनमध्ये श्वान पटविणार बाधितांची ओळख

लेब्राडोर अन् कॉकर स्पेनियलचे प्रशिक्षण सुरू

स्निफर श्वान कोरोना संसर्गाने बाधितांची ओळख पटवू शकतात का ही शक्यता पडताळून पाहण्याची चाचणी ब्रिटनमध्ये सुरू झाली आहे. ब्रिटनचे तज्ञ मेडिकल स्निफर डॉग्स या कामासाठी उपयुक्त असल्याचे म्हटले गेले आहे. या चाचणीकरता सरकारकडून 5 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.

Advertisements

श्वानांमध्ये हुंगण्याची तीव्र तसेच विशेष क्षमता असते आणि ते सार्वजनिक ठिकाणांवर कोरोनाबाधितांची ओळख पटवू शकतात असे तज्ञांचे म्हणणे आहे. जगातील अनेक देशांनी अशाप्रकारे स्निफर श्वानांना कर्करोग, हिवताप आणि पार्किंसन यासारख्या विकारांनी ग्रस्त बाधितांची ओळख पटविणे आणि त्यांची मदत  करण्यासाठी प्रशिक्षण दिलेले आहे.

लॅब्राडोर, कॉकर स्पॅनियलची निवड

लॅब्राडोर आणि कॉकर स्पॅनियल प्रजातीच्या श्वानांना कोविड-19 बाधितांचा गंध हुंगण्यास सक्षम करता येईल का हे या चाचणीत स्पष्ट होणार आहे. तसेच लक्षणे दिसून न येणाऱया माणसामधील विषाणूचा शोध श्वान लावू शकतात हेही पडताळून पाहिले जाणार आहे. अशाप्रकारची पहिली चाचणी लंडन स्कुल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसीनमध्ये सुरू झाली आणि याकरता मेडिकल डिटेक्शन डॉग्स आणि डरहॅम युनिव्हर्सिटीची मदत घेतली जात आहे.

एका तासात 22 स्क्रीनिंग

टेस्टिंग रणनीतिला वेग देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांतर्गत ही चाचणी केली जात आहे. श्वान यंत्रांच्या तुलनेत अधिक वेगाने निष्कर्ष देऊ शकतात अशी आशा असल्याचे उद्गार ब्रिटनचे मंत्री लॉर्ड बेथेल यांनी काढले आहेत. एक बायो डिटेक्शन श्वान तासाला सुमोर 22 जणांना स्क्रीन करू शकतो. याच कारणामुळे श्वानांना भविष्यात कोविड-19 बाधितांची ओळख पटविण्याच्या कामात सामील केले जाऊ शकते.

गंधाचे नमुने अन् श्वान प्रशिक्षण

पहिल्या टप्प्याच्या चाचणीत एनएचएस स्टाफ लंडनच्या रुग्णालयांमध्ये कोरोना विषाणूने बाधित असलेल्या लोकांच्या गंधाचे नुमने प्राप्त करणार आहे. तसेच संसर्ग न झालेल्या लोकांच्या गंधाचेही नमुने प्राप्त केली जातील. यानंतर दोन प्रजातींच्या 6 श्वानांसमोर हे नमुने मांडून विषाणूची ओळख पटविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

दुसऱया टप्प्यात ग्राउंड झिरोवर उतरणार

हिवतापाने ग्रस्त लोकांमध्ये एक विशेष प्रकारचा गंध येतो आणि मेडिकल डिटेक्शन श्वान तो ओळखू शकतात असे अनुभवातून समोर आले आहे. याच आधारावर श्वानांना हिवतापाच्या रुग्णांचा शोध लावण्यासाठी यशस्वीपणे प्रशिक्षित पेले होते. हाच अनुभव आणि नव्या माहितीच्या आधारावर फुफ्फुसाशी संबंधित आजरांमध्येही शरीरातून एक विशेष प्रकारचा गंध येत असल्याचे म्हटले जाऊ शकते. मेडिकल डॉग्स कोविड-19 च्या बाधिताची ओळख पटवू शकतात अशी अपेक्षा असल्याचे लंडन स्कुल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीनचे प्राध्यापक जेम्स लोगन यांनी म्हटले आहे. पहिल्या चाचणीत चांगले निष्कर्ष प्राप्त झाल्यास श्वानांना दुसऱया टप्प्यात ग्राउंड झिरोमध्ये उतरविले जाणार आहे.

Related Stories

कोरोना विषाणूचे आणखी एक रुप

Patil_p

2 महिला न्यायाधीशांची अफगाणिस्तानात हत्या

Patil_p

महामारी काळातील ब्लूमबर्गचा ‘इनोव्हेशन निर्देशांक-2021’ सादर

Patil_p

नोबेल शांतता पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना नामांकन

Patil_p

विषाणूमधील म्युटेशन युरोपमधील दुसऱया लाटेचे कारण

Patil_p

लोकांवर हल्ले करत आहेत कावळे

Patil_p
error: Content is protected !!