तरुण भारत

आझाद गल्लीचे निर्बंध हटणार

प्रतिनिधी/ बेळगाव

आझाद गल्ली येथील महिलेला कोरोनाची लागण झाल्याने हा परिसर निर्बंधित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला होता. एक-दोन दिवसांत या परिसरातील निर्बंध हटणार असून हिरेबागेवाडी येथील परिस्थिती मात्र अद्याप जैसे थे राहणार आहे. कारण या एकाच गावातील आणखी 89 जण अद्याप क्वारंटाईनमध्ये आहेत.

Advertisements

21 एप्रिल रोजी आझाद गल्ली येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्वॅब तपासणी अहवालावरुन स्पष्ट झाल्यानंतर जिल्हाधिकाऱयांनी हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला होता. आता आझाद गल्ली, माळी गल्ली, पांगुळ गल्ली परिसरावरील कोरोनाचे सावट दूर होत आहे.

आझाद गल्ली येथील एका 25 वषीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. संकेश्वर येथील तिच्या वडिलाच्या संपर्कातून ती कोरोनाबाधित झाली आहे. तिच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात उपचार करण्यात आले आहेत. तिच्या संपर्कातील संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

याबरोबरच माळी गल्ली, आझाद गल्ली परिसरातील 360 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले असून त्यामुळे प्रशासनाने व स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. रविवार किंवा सोमवारपासून आझाद गल्ली परिसरावरील निर्बंध हटविण्याची शक्मयता आहे.

हिरेबागेवाडी येथील आणखी 89 जण क्वारंटाईनमध्ये

हिरेबागेवाडी येथील आणखी 89 जण क्वारंटाईनमध्ये आहेत. अद्याप त्यांची स्वॅब तपासणीही व्हायची आहे. या एकाच गावातील 48 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. नवी दिल्ली येथील निजामुद्दीन मरकजमध्ये झालेल्या धार्मिक कार्यक्रमात भाग घेवून गावी आलेल्या 20 वषीय तरुणाच्या संपर्कातून गावात कोरोनाचा फैलाव झाला आहे.

आतापर्यंत या गावातील 30 जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. तर एका वृद्धेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आणखी 17 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. या एकाच गावातील 48 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे हिरेबागेवाडीवरील निर्बंध हटविणे सध्या शक्मय होणार नाही. सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली असली तरी 48 कोरोनाबाधितांच्या प्राथमिक संपर्कातील आणखी 89 जणांची स्वॅब तपासणी होणार आहे. सध्या ते क्वारंटाईनमध्ये आहेत. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला तर हिरेबागेवाडी कोरोनामुक्त होणार आहे. नहून या गावात आणखी खबरदारी घ्यावी लागणार आहे.

Related Stories

आघाडी… पिछाडी… अन् मुसंडी!

Amit Kulkarni

झाडे-झुडुपे हटविण्याचे काम दिखाऊपणाचे

Omkar B

सराफ गल्लीत आनंदोत्सव

Patil_p

शिवनिश्चयतर्फे दीपोत्सव

Amit Kulkarni

शहरातील गर्दी ठरतेय चिंताजनकच

Amit Kulkarni

मनपा महसुल विभागातील कर्मचाऱयाला कोरोनाची लागन

Patil_p
error: Content is protected !!