तरुण भारत

संजय लीला भन्साळींसोबत मयूर वैद्यला करायचेय काम

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्यामुळे, या कठीण काळात संपूर्ण देश लॉकडाऊन झालेला आहे. स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी, काही कठोर नियमांचे पालन आपल्याला करावे लागत आहेत. सेलिब्रिटी मंडळीदेखील याला अपवाद नाहीत. अर्थात, आपापल्या घरात लॉकडाऊन असलेली सेलिब्रिटी मंडळी लाईव्ह येऊन त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधत आहेत. झी युवा वाहिनीवरील ‘युवा डान्सिंग क्वीन’ या स्पर्धेचा परीक्षक मयूर वैद्य, यानेही हा लाईव्हचा पर्याय निवडला आहे.

 नियमितपणे लाईव्ह येत मयूर आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. अशाच एका लाईव्ह सेशनमध्ये त्याच्या चाहत्याने त्याला विचारलेला प्रश्न आणि त्यावर त्याने दिलेलं उत्तर सध्या मनोरंजन सफष्टीत चर्चेचा विषय ठरले आहे. मनोरंजन विश्वातील कोणत्या व्यक्तीसोबत काम करण्याचे स्वप्न आहे? असे मयूरला विचारले असता, त्याचे उत्तर ऐकून सर्वच मंडळी आश्चर्यचकित झाली होती. बॉलीवूडमधील दर्जेदार दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याची इच्छा असण्याचे नेमके कारण विचारल्यावर, मयूरने दिलेले उत्तर अनेकांना अचंबित करणारे होते. संजय भन्साळी यांनी ओडिसी हा नफत्यप्रकार आत्मसात केलेला आहे. म्हणूनच कथ्थकमध्ये निपूण असलेल्या मयूरला, संजय भन्साळींसोबत काम करण्याची इच्छा आहे. ते एक उत्तम दिग्दर्शक तर आहेतच, मात्र नफत्यकलेतसुद्धा त्यांनी प्राविण्य मिळवलेले असल्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खास असेल, असे मयूर वैद्य यांचे म्हणणे आहे. मयूर वैद्य यांनी व्यक्त केलेली ही इच्छा आणि त्यांच्या आवडत्या कलाकारांबद्दल त्यांनी व्यक्त केलेले मत, यामुळे चाहते त्यांच्यावर खूपच खुश आहेत.

Related Stories

सोशल मीडियापासून लांब, पुस्तकांच्या जवळ…

Patil_p

महीला सक्षमीकरणावर भाष्य ‘ निर्मलःएनरुट ’

tarunbharat

झी मराठीवर नात्यांना नवी उमेद देणाऱया 3 वेबसिरीजचे प्रसारण

Patil_p

‘तान्हाजी’ने जिंकला बॉक्स ऑफिसचा गड

triratna

ऑलमोस्ट सुफळ संपूर्णमध्ये येणार ट्विस्ट

Patil_p

हिरोपंती 2 मध्ये टायगर-दिशा

tarunbharat
error: Content is protected !!