तरुण भारत

घरातूनच चित्रीत केला अपहरणाचा प्रसंग

सध्या कोरोनामुळे देशभर टाळेबंदी असल्याने सर्वच प्रकारचे शूटिंग ठप्प आहे. दैनंदिन मालिकांना याचा अधिक फटका बसला आहे. सध्या टीव्हीवर जुन्या मालिका किंवा सध्या सुरू असलेल्या मालिकांचे जुनेच भाग पुर्नप्रसारित करण्यात येत आहेत. पण कलर्स वाहिनीवरील ‘नाटी पिंकी की लंबी लव्हस्टोरी’ या मालिकेने एक पाऊल पुढे टाकत घरात राहूनच शूटींग सुरु ठेवले आहे. या मालिकेच्या एका भागातील अपहरणाचा प्रसंग घरातूनच चित्रीत करण्यात आला आहे.

 कल्पना करा की अपहरणाचा सीन सर्व अभिनेते एका ठिकाणी नसताना कसा चित्रीत केला जाईल? नाही करता येणार, हो ना? ‘नाटी पिंकी की लंबी लव्ह स्टोरी’साठी कलर्स वाहिनीने नुकतेच लॉकडाऊन असतानाही अपहरणाचा एक संपूर्ण सीन घरातून चित्रीत केला. सध्या चालू असलेल्या ट्रकमध्ये, गगनला सूड उगवायचा असतो, त्याला मार्ग सापडतो आणि तो पिंकीचे अपहरण करतो. अर्जुनला जेव्हा हे कळते तेव्हा तो संतापतो आणि पिंकीची सुटका करतो. हा सीन खूप थरारक असला तरी, अभिनेत्यांना त्याचे चित्रण चालू असताना मजा आली. तासंतास केलेले व्हिडिओ कॉल, खूप काळ केलेले ब्रिफींग आणि तंत्रज्ञांच्या क्रॅश कोर्सनंतर, अखेरीस पिंकीच्या अपहरणाचा होम शॉट व्हिडिओ पूर्ण झाला.  

Advertisements

 यातील तिच्या अनुभवाविषयी बोलताना, रिया शुक्ला म्हणाली, “माझ्या मनात जेव्हा अपहरणाचा विचार येतो तेव्हा मला दोरखंड, व्हिलन, नायक आणि नायिकेला वाचविण्यासाठी सुरु असलेली धडपड असे चित्र डोळ्य़ांसमोर उभे राहते. पण या सीनसाठी आम्ही जेव्हा चित्रीकरण केले तेव्हा माझे हे विचार पूर्णपणे बदलून गेले. हे खूपच नवीन आणि वेगळे होते. हा असा अनुभव होता जो  आयुष्यभर लक्षात राहणार आहे. हा व्हिडिओ चित्रीत करताना आम्हा सर्वांना खूप मजा आली आणि मला आशा आहे की आम्हाला जशी चित्रीत करताना मजा आली तशीच प्रेक्षकांनाही येईल.

Related Stories

‘आदिपुरुष’च्या चित्रिकरणास मुंबईत प्रारंभ

Patil_p

अभिनेता सोनू सूद 25 हजार लोकांना देणार रमजानमध्ये भोजन

prashant_c

वजनदार डान्सिंग क्वीनची बॅकस्टोरी

Patil_p

शशांक केतकर प्रथमच नकारात्मक भूमिकेत

Patil_p

गल्फ सिने फेस्ट 2021 च्या लोगोचे महेश कोठारेंच्या हस्ते अनावरण

Patil_p

विदेशी भक्तांना पोस्टाद्वारे मिळते भस्म

Amit Kulkarni
error: Content is protected !!