तरुण भारत

बोरुसिया डॉर्टमंडचा एकतर्फी विजय

बुंदेस्लिगा फुटबॉलचे पुनरागमन, हालँड पहिल्या गोलचा मानकरी, ग्लाडबाचची प्रँकफर्टवर मात

वृत्तसंस्था/ बर्लिन

Advertisements

दोन महिन्याहून अधिक कालावधीनंतर एर्लिंग हालँडने बुंदेस्लिगाचा पहिला गोल नोंदवला आणि तो साजराही केला, पण एकटय़ानेच. त्याचे सहकारी यावेळी दूरच होते. कोव्हिड 19 मुळे थांबलेले फुटबॉल दोन महिन्यांच्या खंडानंतर शनिवारी बोरुसिया डॉर्टमंड व शॅल्क यांच्यातील सामन्याने पुन्हा सुरू झाले आणि जर्मनीतील या लीगचीही पुढे सुरुवात झाली. शनिवारी एकूण सहा सामने झाले. डॉर्टमंडने हा सामना 4-0 असा जिंकला.

19 वर्षीय हालँड गोल साजरा करीत असताना त्याचे संघसहकारी मात्र दूर राहिले. कोरोना व्हायरसमुळे खेळाडूंवर काही निर्बंध घालण्यात आले आहेत, त्याचे प्रत्येक खेळाडू काटेकोर पालन करीत होता. प्रेक्षकांच्या गैरहजेरीत हा सामना खेळविण्यात आला. सामना सुरू असताना फक्त खेळाडू, प्रशिक्षकांच्या सूचना, सॅनिटाईज केलेल्या फुटबॉलला मारलेली किक यांचेच आवाज मैदानात घुमत होते. खेळाडूंना भावनांवर आवर घालण्याचे सक्त आदेश दिले असून थुंकणे, हस्तांदोलन करणे, आलिंगन देणे यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. जगभरातील फुटबॉलशौकिनांनी आपल्या देशातील लीगचीही पुन्हा सुरुवात होईल, या अपेक्षेने या सामन्याचा आनंद घेतला. संघात न खेळणारे खेळाडू, स्टाफ मास्क लावून बसले होते तर बदली खेळाडू स्टँड्समध्ये बसले होते. चेंडू व आसनांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते.

हालँडने बुंदेस्लिगातील नोंदवलेला हा 9 सामन्यांतील 10 वा गोल होता. गोल नोंदवल्यानंतर त्याने जपूनच डान्स केला. पण सहकारी त्यापासून दूर राहिले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत त्यांनी दुरुनच त्याचे टाळय़ा वाजवून अभिनंदन केले. थॉर्गन हॅझार्डने दिलेल्या क्रॉसवर हालँडने 29 व्या मिनिटाला बोरुसिया डॉर्टमंडला आघाडीवर नेले. नंतर ज्युलियन ब्रँडने निर्माण केलेल्या संधीवर 45 व्या मिनिटाला राफेल गुरेरोने दुसरा आणि थॉर्गन हॅझार्डने ब्रेकनंतर 48 व्या मिनिटाला गोल नोंदवून संघाची आघाडी 3-0 अशी केली. गुरेरोने 63 व्या मिनिटाला हालँडच्या पासवर संघाचा चौथा गोल नोंदवून विजयावर शिक्कामोर्तब केला.

अन्य सामन्यात आरबी लीपझिग व फ्रीबर्ग यांच्यात 1-1 अशी बरोबरी झाली तर बोरुसिया माँचेनग्लागडबाचने इन्ट्रच प्रँकफर्टवर 3-1 अशी मात केली. ग्लाडबाचचे गोल ऍलासेन प्लीया, मार्कस थुरम व रॅमी बेन्सेबेन यांनी नोंदवले. त्यांचे 26 सामन्यांतून 52 गुण झाले असून ते आता तिसऱया स्थानी पोहोचले आहेत. बायर्न म्युनिच संघ सध्या अग्रस्थानावर आहे. प्रँकफर्टचा हा सलग चौथा पराभव असून त्यांचे 28 गुण झाले आहेत.

Related Stories

बायर्न म्युनिचची जेतेपदाकडे वाटचाल

Patil_p

हॉकी स्पर्धा लांबणीवर

Patil_p

द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारताचे पहिले सराव सत्र संपन्न

Patil_p

भारताचे माजी बॉक्सर डिंको सिंग यांना कोरोनाची बाधा

Rohan_P

सॅफ फुटबॉल स्पर्धेसाठी 23 खेळाडू जाहीर

Patil_p

राजस्थान रॉयल्स-सीएसके लढत आज

Patil_p
error: Content is protected !!