तरुण भारत

लिम्पिआधुरा, लिपुलेख आणि कालापानी हे नेपाळचेच भाग; नेपाळचा दावा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

कैलास मानसरोवरला जाणाऱ्या भारतीय यात्रेकरुंचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी भारताने लिपुलेख पासपर्यंत रस्ता बांधला आहे. उत्तराखंडच्या घाटियाबागढ ते लिपूलेख हा 80 किलोमीटरचा मार्ग 8 मे रोजी सुरु झाला. भारत, नेपाळ आणि चीन या तीन देशांच्या सीमा जिथे मिळतात त्या ट्रायजंक्शनजवळ हा मार्ग आहे. या मार्गावर आता नेपाळवर आक्षेप घेतला आहे. 

Advertisements

लिपुलेख, लिम्पिआधुरा आणि कालापानी हा भाग नेपाळचाच असल्याचा दावा करत नेपाळ यासंदर्भातील नकाशा प्रकाशित करणार आहे. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नकाशाला मान्यता देण्यात आली. त्यानुसार भारताच्या हद्दीतील लिम्पिआधुरा, लिपुलेख आणि कालापानी हे भाग नेपाळमध्ये दाखविण्यात आले आहेत. 

लिम्पिआधुरा, लिपुलेख आणि कालापानी हे भाग परत मिळवण्यासाठी नेपाळकडून महत्वाची पाऊले उचलली जात आहेत. त्यासाठीच नेपाळने अधिकृत नकाशा तयार केला आहे. महाकाली (शारदा) नदीचा स्त्रोत लिम्पिआधुरामध्ये आहे आणि तो भारताच्या उत्तराखंड राज्याच्या भाग आहे. त्या भागावरदेखील नेपाळने आपला दावा सांगितला आहे. भारताने काही दिवसांपूर्वी लिपुलेख पासपर्यंत रस्ता बांधला तो सर्वांसाठी खुला केला होता. त्यानंतरच नेपाळच्या मंत्रिमंडळाचा हा निर्णय समोर आला आहे.     

Related Stories

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या अडीच हजारांवर

prashant_c

चीनमध्ये सापडला नवीन स्वाइन फ्लू

datta jadhav

महाराष्ट्रात कोरोना : मागील 24 तासात 58,924 नवे रुग्ण; 351 मृत्यू

pradnya p

बायडेन यांच्या प्रचारात ओबामा होणार सहभागी

datta jadhav

सातारा : कोरोनाचा तेरावा आठवडा जास्त दाहक : जिल्ह्यात भयकंप

triratna

रुग्णसंख्येप्रकरणी रशिया तिसऱया क्रमांकावर

Patil_p
error: Content is protected !!