तरुण भारत

फुटबॉल हंगामाला ब्रेक : लाखोंची उलाढाल ठप्प

‘लॉक डाऊन’चा संघ, खेळाडू व पंचांना आर्थिक फटका

– मंडळांवर पडतोय स्थानिक-परदेशी खेळाडूंवरील खर्चाचा बोजा

Advertisements

नंदकुमार तेली/कोल्हापूर

कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव झपाटयाने वाढू लागल्याने यावर नियंत्रासाठी संपूर्ण देशात संचारबंदी (लॉक डाऊन) लागू करण्यात आला. कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामाला काही स्पर्धांनंतरच ब्रेक लागल्याने लाखोंची उलाढाल ठप्प झाली. तसेच संघ, खेळाडू व पंचांना आ†िर्थक फटका बसला आहे. मंडळांवर 2019-20 साठी करारबध्द केलेल्या स्थानिक-परदेशी खेळाडूंवरील होणारा खर्चाचा बोजा पडत आहे.

एका स्पर्धेत 9 ते 10 लाखांची उलाढाल

छत्रपती शाहू स्टेडियवर सुरू असलेल्या सिनिअर (वरीष्ठ गट) फुटबॉल स्पर्धेतील विजेत्यांना 1 ते 1.5 लाखांपेक्षा अधिक रक्कमेच्या बक्षिसांबरोबर इतर बक्षिसांची खैरात असते. तसेच स्पर्धेतील प्रत्येक सामने पाहण्यासाठी होणारी गर्दी व प्रतिसादामुळे तिकीट विक्री मोठया प्रमाणात होते. एका स्पर्धेला सुमारे 9 ते 10 लाखांची होणारी उलाढाल सध्या ठप्प झाली आहे.

हंगामातील 7 ते 8 स्पर्धांना लागला ब्रेक

महापौर चषक फुटबॉल स्पर्धेला ब्रेक 12 मार्चला प्रॅक्टीस अ विरुध्द बालगोपाल यांच्यातील उपांत्य सामन्यानंतर लागला. यानंतर दुसरा उपांत्य सामना 13 मार्चला दिलबहार अ विरुध्द फुलेवाडी यांच्यात, 14 मार्चला प्रदर्शनिय सामना तर अंतिम सामना 15 मार्चला होणार होता. लॉक डाऊनमुळे स्पर्धा स्थगित करण्यात आल्या असून हंगामातील 7 ते 8 स्पर्धांना ब्रेक लागला आहे.

मंडळांवर पडतोय खेळाडूंच्या खर्चाचा बोजा   

कोल्हापूरच्या फुटबॉलने कार्पोरेट (व्यावसायिकता) रुप धारण केल्यामुळे मजबूत संघ बांधणीवर प्रत्येक संघांनी भर दिला होता. याअंतर्गत प्रमुख संघांनी लाखो रूपये खर्चून स्थानिकसह राज्य, राष्ट्रीय व परदेशी खेळाडूंना करारबध्द केले होते. यामध्ये स्थानिक खेळाडूंना 50 ते 70 हजार तर परदेशी खेळाडूंना सुमारे 1.5 लाखांपर्यंतचे मानधन प्रती महिना देऊन करारबध्द केले आहे. हंगामातील स्पर्धांना ब्रेक लागल्यामुळे त्यांच्यावरील खर्चाचा बोजा मंडळांवर पडला आहे. 

राज्य शासनाचा आदेश महत्वाचा

फुटबॉल हंगाम व स्पर्धा सुरू करण्यासाठी राज्य शासनाच्या आदेश महत्वाचा आहे. केएसए यासंदर्भात कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. स्पर्धा नसल्यामुळे बक्षिसांची रक्कम मिळत नाही. त्यामुळे मंडळाच्या वर्गणीवर संघ व खेळाडूंचा खर्च सुरू आहे. ज्येष्ठ फुटबॉल खेळाडू विकास पाटील

फुटबॉलला ग्रहण लागण्याची भिती

कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशन (केएसए)ने गेल्या 2 महिन्यांपासून फुटबॉल स्पर्धा व हंगाम संदर्भात प्रमुख संघांशी कोणताही पत्रव्यवहार केला नाही. केएसएने संघ व खेळाडूंच्या नोंदणीशिवाय अडचणी सोडविण्यासाठीची कोणतीही जबाबदारी पार पडलेली नाही. त्यांच्या या गळचेपी धोरणामुळे कोल्हापूरच्या फुटबॉलला ग्रहण लागण्याची भिती निर्माण झाली आहे. –रमेश मोरे, सचिव प्रॅक्टीस फुटबॉल क्लब

खेळाडूंचे मैदानावरील परीश्रम वाया

सिनिअर गटातील प्रमुख फुटबॉल संघांनी व्यावसायिकदृष्टया स्थानिक व परदेशी खेळाडूंना करारबध्द केले आहे. मजबूत संघ बांधणीसाठी मंडळांनी केलेला खर्च व संघाच्या दर्जेदार खेळासाठी मैदानावर खेळाडूंनी केलेले कठोर परीश्रम वाया गेले आहे. तसेच मे महिन्यातील शिबीरे सी डिव्हीजन लीग स्पर्धांनाही ब्रेक लागल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.-प्रदीप साळोखे, सचिव (कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशन)

क्षमता टिकवण्यासाठी घराच्या टेरेसवर सराव

फुटबॉल हंगाम स्थगित झाल्यामुळे संघासह खेळाडूंचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. परदेशी खेळाडूंवरील खर्चाचा बोजा मंडळांवर असून स्थानिक खेळाडूंच्या मानधनातील 20 ते 30 टक्के कपात झाली आहे. पीटीएम ए, बी व सी संघातून सुमारे 20 खेळाडू खेळतात. तर परिसरातील पाच पंचांच्या मानधनाचा प्रश्न निर्गाण झाला आहे. शारीरिक क्षमता टिकवून ठेवण्यासाठी घराच्या टेरेसवर सराव सुरू ठेवला आहे. अक्षय मेथेपाटील, पाटाकडील तालीम मंडळ स्टार खेळाडू

Related Stories

सचिन सावंत यांचा प्रवक्तेपदाचा राजीनामा

datta jadhav

पुलाची शिरोलीत मोबाईल व पाकीट चोरांचा धुमाकूळ

Abhijeet Shinde

भारतीय टीमचा प्रशिक्षक व्हायचे आहे : शोएब अख्तर

Rohan_P

स्टोक्सच्या गैरहजेरीत राजस्थानसमोर दिल्लीचे आव्हान

Patil_p

देऊळ बंद पण भक्तांना थांबवणार कोण?

Patil_p

अँडरसनचे 5 बळी, सिबलीचे नाबाद अर्धशतक,

Patil_p
error: Content is protected !!