तरुण भारत

साळावलीच्या जलाशयात बेकायदा रेती उपसा

प्रशासनाकडून कारवाई, रेती परत पाण्यात टाकली

प्रतिनिधी / सांगे

Advertisements

साळावली धरणाच्या जलाशयात कुर्पे येथे ग्रीन लँड म्हणून ओळखल्या जाणाऱया ठिकाणी बेकायदा वाळू उपसा करण्यात येत असल्याचे कळल्यानंतर सांगेतील प्रशासनाने त्याची दखल घेऊन नुकतीच आवश्यक कारवाई केली. धरणाच्या जलाशयात वाळू उपसा करण्यास बंदी आहे. असे असले, तरी वरील ठिकाणी रेती उपसा करून ठेवण्यात आली होती.

याची तक्रार सांगे येथील मामलेदार कार्यालयाला मिळताच संयुक्त मामलेदार ऍना रिटा पाईस यांनी घटनास्थळी धाव घेऊन वर काढून ठेवण्यात आलेली रेती जेसीबी यंत्राच्या साहाय्याने पुन्हा पाण्यात टाकली. सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन असून काही लोक त्याचा अशा प्रकारे फायदा घेण्यास मागे-पुढे पाहत नाहीत, असे यावेळी सांगण्यात आले. या कारवाईच्या वेळी तलाठी श्याम वाडकर हेही हजर होते.  जलस्रोत खात्याने अशा गोष्टींवर नजर ठेवणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया सध्या व्यक्त होत आहे. कारण सदर जागा त्यांच्याच अखत्यारित येते.

Related Stories

अर्थसंकल्पसंबंधी चर्चेवरुन गदारोळ

Patil_p

गोव्यात गेल्या दोन दिवसांत कोविड-19 चा एकही रुग्ण नाही

Omkar B

ह्रदयरोग टाळण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करा : डॉ. देसाई

Amit Kulkarni

तोतया मंत्री सुनिल सिंग व त्याच्या समुहावर कडक कारवाई करावी

Patil_p

भाऊसाहेबांच्या शैक्षणिक धोरणाला भाजपा सरकारकडून हरताळ

Amit Kulkarni

नागरिकत्व कायदा दुरुस्तीला विरोधामागे दिशाभुलीचा हेतू

Patil_p
error: Content is protected !!