तरुण भारत

राज्यातील समाजकंटक व सायबर गुन्हेगारांवर ३६३ गुन्हे दाखल

मुंबई / प्रतिनिधी

लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पावले उचलली असून राज्यात ३९८ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली.

Advertisements

टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात  महाराष्ट्र राज्यातील विविध पोलिस स्टेशनमध्ये एकूण ३९८ गुन्ह्यांची (ज्यापैकी १८ एन. सी. आहेत) नोंद १८ मे २०२० पर्यंत झाली आहे.

या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १६९ गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १५७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी १८ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट्स केल्याप्रकरणी सात गुन्हे दाखल झाले आहेत. इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी चार गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, यू ट्यूब) गैरवापर केल्याप्रकरणी ४३ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत २१२ आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी १०२ आक्षेपार्ह पोस्ट्स टेकडाऊन करण्यात यश आले आहे.

पुणे ग्रामीण पोलिस अंतर्गत पौंड पोलिस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नोंद झालेल्या
गुन्ह्यांची संख्या ३१ वर गेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीला धार्मिकतेचा रंग देणारी पोस्ट आपल्या फेसबुक अकाऊंट शेअर केली होती. त्यामुळे परिसरातील शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

ऑनलाईन व्यवहारात सावध राहा

सध्या लॉकडाऊनच्या काळात, काही उपहारगृहे, हॉटेल ऑनलाईन ऑर्डर घेत असून त्याचे बिलसुद्धा ऑनलाईन भरण्यास सांगत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागामार्फत आवाहन करण्यात येते की, लोकांनी ऑनलाइन व्यवहारापासून सावध रहावे. काही सायबर भामटे मोठ्या हॉटेलच्या नावाने बोगस वेबसाईट बनवून लोकांना लुबाडत आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या ऑर्डर देताना संबंधित वेबसाईट ही त्या हॉटेलची अधिकृत वेबसाईट आहे, याची खात्री करावी आणि मग नंतर द्यावी. ऑनलाईन ऑर्डर देताना जर कोणती वेबसाईट तुम्हाला तुमच्या डेबिट, क्रेडिट कार्ड, पिन नंबर मागत असेल तर चुकूनही देऊ नका जर अशा वेबसाईट किंवा अँपवर तुम्ही फसविले गेले असाल तर त्याची तक्रार जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये नोंद करा व www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर पण  नोंदवा. केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जे नियम व आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका, असे आवाहन सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Stories

जिह्यात कोराना मृतांची संख्या 400 पार

Patil_p

सहा महिन्यांत कोपर्डी खटला निकाली काढा : खासदार संभाजीराजे

Abhijeet Shinde

372 अंगणवाडय़ा, 185 शाळांना मिळणार नळ कनेक्शन

NIKHIL_N

चिंताजनक : महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 122 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

ट्रव्हल्स कंपन्यांना पास कसे मिळतात?

NIKHIL_N

वाढत्या रुग्णांसमोर ‘व्हेंटिलेटर’ कमतरतेचा प्रश्न

Patil_p
error: Content is protected !!