तरुण भारत

फेसबुकची ऑनलाईन शॉपिंगची सुविधा

बंद काळात लहान व मध्यम व्यावसायिकांना दिलासा

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

कोविड 19 च्या महामारीच्या संकटातून सावरण्यासाठी विविध व्यवसाय ठप्प आहेत. यामुळे त्यांना मोठय़ा प्रमाणात नुकसान सहन करावे लागते आहे.  आपल्या कर्मचाऱयांना तंत्रज्ञानावर आधारीत सुविधा देत काही टक्क्मयांपर्यंत व्यवसाय सुरु करण्यात येत आहेत. यामध्ये सोशल मीडियामधील दिग्गज कंपनी फेसबुकने आपल्या लहान व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने शॉपिंगची सुविधा देण्यावर भर देण्याचे ठरवले आहे. लहान आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांना संधी दिली जाणार आहे.

अर्थव्यवस्थेचे चक्र सर्व बाजूने थांबले असताना त्याला चालना देण्यासाठी आगामी काळात कंपनी ई कॉमर्सचा विस्तार करणार आहे. यामध्ये लहान दुकाने व रेस्टॉरन्ट यांना प्रवेश देत त्यांचा व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे फेसबुकचे सीईओ झुकरबर्ग यांनी सांगितले आहे.

व्यापाऱयांना या प्लॅटफार्मवरुन आपले ऑनलाईन व्यवहार करता येणार असून यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. फेसबुकसोबत इंस्टाग्रामवरही या दुकानांची प्रोफाईल दिसणार आहे. तसेच आपल्या उत्पादनांचा तपशीलही ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यास यातून मदत होणार असल्याचे फेसबुकने स्पष्ट केले आहे.

Related Stories

आर्थिक वृद्धीदर 12.8 टक्क्यावर राहण्याचे संकेत

Amit Kulkarni

टेस्लाकडून भारतात भरतीचे नियोजन

Patil_p

विदेशी गुंतवणूकदारांनी 4 हजार कोटी काढले

Patil_p

स्विगीची सेवा आता 125 शहरांमध्ये

Patil_p

साखरेची विक्रमी निर्यात होणार?

Patil_p

भारती एअरटेलमध्ये गुंतवणुकीस ऍमेझॉन उत्सुक

Patil_p
error: Content is protected !!