तरुण भारत

विदेशी गुंतवणूकदारांनी काढले 26 अब्ज डॉलर्स

भारतामधील आकडा 16 अब्ज डॉलर्सवर : अमेरिकी काँग्रेसच्या अहवालातून स्पष्ट

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

Advertisements

कोविड 19चा विळखा साऱया जगाला पडला आहे. यामध्येच सर्वत्र लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्यामुळे उद्योगधंदे ठप्प झाल्यामुळे अर्थचक्र मंदावले आहे. याच कालावधीमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी आशियाई अर्थव्यवस्थेमधील जवळपास 26 अब्ज अमेरिकन डॉलर्स काढले असून भारतामधील 16 अब्ज अमेरिकन डॉलर्सही काढून घेतले असल्याची माहिती अमेरिकेच्या काँग्रेसकडून सादर करण्यात आलेल्या अहवालातून दिली आहे.

कोविड 19 च्या विळख्यात जागतिक अर्थव्यवस्था व विकसनशील आशियाई अर्थव्यवस्थेवरील परिणामासंबंधी अमेरिकेच्या काँग्रेसकडून स्वतंत्र शोध निबंध तयार करण्यात आला आहे. याच्या नोंदी सदर अहवालात करण्यात आल्या आहेत.

मदतीची मागणी

सदर अहवालातील नोंदीनुसार युरोपमधील जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, स्पेन आणि इटली या देशातील लोकांनी सरकारी मदत मिळावी यासाठी तब्बल 3 कोटी नागरिकांनी अर्ज सादर केले आहेत. 

प्रमुख अर्थव्यवस्था व कोविड 19

अमेरिकन काँग्रेसच्या अहवालानुसार जवळपास सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांना कोविड 19चा मोठा फटका बसला असून यात मात्र चीन, भारत आणि इंडोनेशिया यांचा विकास दर 2020 मध्ये सकारात्मक राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Related Stories

आयसीआयसीआय लोम्बार्डचा मल्टी ट्रिप ट्रव्हल इन्शुरन्स

Patil_p

. बीपीसीएल खरेदीच्या निविदा सादर करण्यास मुदत वाढ

Patil_p

अखेर सहा दिवसांचा तेजीचा प्रवास थांबला

Patil_p

टाटाच्या या कंपनीने दिले लाखाचे 13 लाख

Patil_p

देशाची निर्यात 47 टक्क्यांनी तेजीत

Patil_p

चढउताराच्या सत्रात सेन्सेक्स तेजीत

Patil_p
error: Content is protected !!