तरुण भारत

स्मार्टफोन कंपनी रियलमीचा टीव्ही येणार

नवी दिल्ली 

 चीनमधील प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी रियलमी लवकरच टीव्हीच्या उत्पादनात प्रवेश करणार असून येत्या 25 मे रोजी नव्या टीव्हीचे सादरीकरण होणार आहे. या टीव्हीमध्ये आधुनिक सुविधांची भर असणार असून लवकरच भारतीय बाजारपेठेत हा टीव्ही सादर होणार आहे. तसेच सोबत अन्य आठ प्रकारची उत्पादनेही या अनुषंगाने सादर केली जाणार आहेत. 

Advertisements

सध्या लॉकडाऊनचा कालावधी सुरु असल्यामुळे कंपनीने सदर टीव्हांची विक्री ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. यामध्ये ग्राहकांना फक्त दोन हजार रुपयांच्या रक्कमेवर आपल्या पसंतीचा टीव्ही बुक करण्याची संधी 18 ते 24 मे या कालावधीत उपलब्ध होणार आहे. रोख रक्कम जमा करुन टीव्ही घरी नेण्याची सुविधा मात्र 25 ते 31 मे या दरम्य़ान असेल. यासाठी ग्राहकांना कंपनीच्या कार्यालयीन वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.

फिचर

या स्मार्ट टीव्हीमध्ये 64 बिट मीडीयाटेक प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. तसेच 24 वॉटच्या चार स्पीकर्सची सोय आहे. क्वाड कोर चिपसेटसोबत 470 एमपी3 जीपीयू उपलब्ध होणार आहे.

Related Stories

खादीच्या बनावट उत्पादनांप्रकरणी तंबी

Patil_p

अदानी गॅसचे होणार नामकरण

Patil_p

फ्लिपकार्टची अदानी ग्रुपसोबत भागीदारी

Patil_p

इनफिनिक्स झिरो 8 आय बाजारात

Patil_p

तिसऱया दिवशी सेन्सेक्स 562 अंकांनी कोसळला

Patil_p

व्होडाफोन आयडियाची यशस्वी वेगवान 5 जी चाचणी

Patil_p
error: Content is protected !!