तरुण भारत

पुन्हा मलेशियातून पाम तेलाची आयात सुरु

जानेवारीत देशाने घातलेली बंदी : चार महिन्यानंतर पुन्हा प्रारंभ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

भारताने जानेवारीमध्ये मलेशियामधून आयात करण्यात येणाऱया पाम तेलावर बंदी घातली होती. मलेशिया व भारत दोन्ही देशांमध्ये राजकीय वादातून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु या तणावाच्या वातावरणावर पडदा पडला असून पुन्हा चार महिन्यांच्या कालावधीनंतर मलेशियातून पाम तेलाची भारताने आयात सुरु केली आहे. कारण भारत हा खाद्यतेलाची आयात करणारा जगातील प्रमुख देश आहे. 

मलेशियामध्ये नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर भारत आणि मलेशिया यांच्यातील व्यापार संबंधामध्ये सुधारणा होत गेल्याचे पहावयास मिळाले आहे. यामुळे मागील आठवडय़ात मलेशियाने भारतासोबत विक्रमी 1 लाख टन तांदूळ खरेदी करण्याचा व्यवहार झाला आहे. प्रमुख भारतीय निर्यातदारांनी मलेशियामधून 2 लाख टन कच्चे पाम तेलाची आयात करण्याचा करार करण्यात आला असून सदरची ऑर्डर येत्या जून व जुलैमध्ये पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.

आयातीचा वेग कमीच

उपलब्ध आकडेवारीनुसार 2020 च्या पहिल्या चार महिन्यात भारताने एकूण पाम तेलाची आयात सन 2019 च्या कालावधीच्या तुलनेत 50 टक्क्मयांनी कमी झाली आहे. कारण भारत जगात सर्वाधिक खाद्य तेलाचा आयातदेश आहे तर मलेशिया हा दुसरा सर्वात मोठा पाम तेलाचा निर्यातदेश आहे. सध्या तेलाची किमत मागील 10 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचली आहे.

वार्षिक आयातीचा टक्का

भारत वार्षिक पातळीवर जवळपास 90 लाख टन पाम तेलाची आयात करतो. यामध्ये जास्त करुन इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांकडून भारताला तेल पाठविण्यात येते तर सोबत अर्जेटिना आणि ब्राझील यांच्याकडून सुर्यफूल व शेंग तेलाची खरेदी केली जाते.

Related Stories

जागतिक बाजारातील संकेतामुळे तेजीची झुळूक

Patil_p

वयोपरत्वे करावयाची गुंतवणूक

Omkar B

अर्थव्यवस्थेत 9 टक्क्मयांच्या घसरणीचे संकेत

Patil_p

वाहनांची संख्या घटल्यास, नवी वाहने होणार स्वस्त?

Patil_p

आजपासून भारत बॉण्ड इटीएफची तिसरी आवृत्ती होणार खुली

Amit Kulkarni

स्मार्टवॉचमध्ये ‘सॅमसंग’च नंबर वन

Patil_p
error: Content is protected !!